मुंबई, 17 एप्रिल: मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना रमजान सध्या सुरू आहे. या दिवसात रोजाची सुरुवात सकाळी सेहरीनं होते आणि त्यानंतर संध्याकाळी इफ्तारनं रोजा सोडला जातो. इस्लामिक मान्यतेनुसार, रमजान महिन्यात सूर्योदयापूर्वी अन्न ग्रहण केलं जातं, याला ‘सेहरी’ असं म्हणतात. अभिनेत्री राखी सावंतसुद्धा नुकतीच एका विमानतळावर सेहरी करताना दिसली. त्यासाठी तिनं ज्या दुकानातून खाद्यपदार्थ घेतले त्याचा व्हिडिओसुद्धा समोर आलाय. ‘नवभारत टाइम्स’ने याबाबत वृत्त दिलंय. राखी सावंत वेगवेगळ्या कारणांनी सातत्यानं चर्चेत असते. तिच्या पर्सनल लाईफपासून ते प्रोफेशनल लाईफपर्यंत सतत चर्चा सुरू असते. तुम्हाला माहिती आहे का, राखी सावंतनं आदिल खान दुर्रानीशी लग्न केल्यानंतर धर्म बदलला आहे, व तिनं रमजानमध्ये उपवास करण्यास सुरुवात केली आहे. ती कधी इफ्तारी करताना तर कधी नमाज अदा करताना दिसते. त्यातच आता ती विमानतळावर सेहरी करताना दिसली. याचा एक व्हिडिओ समोर आलाय.
व्हिडिओमध्ये नेमकं काय? विरल भयानी यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, राखी सावंत दुकानदाराला म्हणतेय, ‘एक वडा आणि एक इडली द्या. मी विमानतळावर सेहरी करत आहे.’ यानंतर दुकानदार राखीला 600 रुपये बिल मागतो. त्यावर तुझं डोकं खराब झालं आहे का? एका प्लेटमध्ये एक इडली आणि एका वडा देतो, व त्याचे 600 रुपये मागतोस. हा मूर्ख बनवत आहे, असं राखी म्हणते. मात्र, त्यावर दुकानदार सांगतो की, ‘तुम्ही दुकानातून जे काही खरेदी केले आहे, त्या सर्वांचे पैसे मी एकत्र सांगतोय.’ Alka Kubal: ‘तोकडे ड्रेस घालून शरीरप्रदर्शन करण्यापेक्षा…’ हिंदी चित्रपटांबद्दल स्पष्टच बोलल्या अलका कुबल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, त्यानंतर राखी सावंत सेहरी करते. त्यासाठी मोबाइल स्क्रिनवरील काहीतरी वाचायला जाते, व म्हणते काही चुकलं तर मला माफ करा; पण तेव्हा तिथे असणारा दुकानदार तिला वाचण्यासाठी मदत करतो. त्यानंतर राखी सावंत खायला लागते. या व्हिडिओवर विविध कमेंट येत आहे. काहींनी तिचं कौतुक केलं आहे. तर काहींनी तिच्यासाठी प्रार्थनाही केली आहे.
दरम्यान, राखी सावंत रमजान महिन्यात कधी-कधी रोजा ठेवत असल्याचं सांगते. तिचा रोजा तुटला तर त्याबाबतही ती माहिती देत असते. मात्र, यामागील सत्य काय आहे, ते फक्त तिलाच माहिती आहे. पण सध्या विमानतळावरील समोर आलेल्या व्हिडिओमध्ये ती एका रेस्टॉरंटमध्ये इडली-सांबार खाताना दिसत आहे, व ती सेहरी करत असल्याचं सांगत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगानं व्हायरल होत असून, त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अनेकांनी या व्हिडिओला लाईक केलं असून, काहीजण त्यावर कमेंटसुद्धा देत आहेत.