मुंबई 21 ऑगस्ट**:** राखी सावंत (Rakhi Sawant) हिला बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणून ओळखलं जातं. चित्रविचित्र आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे ती नेहमीच चर्चेत असते. अलिकडेच ती तिच्या स्पायडरमॅन व्हिडीओमुळे चर्चेत होती. रस्त्यावर ती स्पायडरमॅनचा पोशाख परिधान करून फिरत होती. त्यानंतर आता ती रक्षा बंधन या सणामुळे चर्चेत आहे. राखीला बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला राखी बांधायची आहे. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत राखीने आपल्या वैयक्तीक आयुष्यावर भाष्य केलं. त्यावेळी तिने सलमान खानला राखी बांधण्याची इच्छा व्यक्त केली. “मला सलमानला राखी बांधायची आहे, कारण त्याने माझ्या आईला नवीन जीवन दिलं. मला त्याच्यासाठी खास त्याचा फोटो असलेली राखी हवी आहे. कोणी बनवू शकेल का?” असं ती या मुलाखतीत म्हणाली. सलमानसोबतच तिला ‘बिग बॉस 14’चा स्पर्धक विकास गुप्ताला देखील राखी बांधायची आहे. देवमाणूस सध्या काय करतोय? फौजी वेशात नव्या भूमिकेसाठी सज्ज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
राखीचं खरं नाव नीरु भेदा असं आहे. रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी तिने आपलं नाव बदललं. तिचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. आर्थिक टंचाईमुळे तिला पुरेसं शिक्षण घेता आलं नाही. लहान वयातच घराची आर्थिक जबाबदारी तिला सांभाळावी लागली. वयाच्या १३ वर्षी पेन कंपनीत काम करुन ती घराचा खर्च भागवायची. लहानपणापासूनच राखीला नृत्याची खूप आवड होती. गणेशोत्सव, दिवाळी, नवरात्र अशा सणांच्या निमित्तानं आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांमध्ये राखी भाग घेत असे. अन् तिथूनच तिच्या करिअरची सुरुवात झाली. 1997 साली ‘अग्निचक्र’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये तिने आयटम सॉन्गवर डान्स केला.