मुंबई 21 ऑगस्ट**:** राखी सावंत (Rakhi Sawant) हिला बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणून ओळखलं जातं. चित्रविचित्र आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे ती नेहमीच चर्चेत असते. यावेळी देखील राखीचा असाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Rakhi Sawant funny video viral) यामध्ये ती एका वेगळ्याच हेअर स्टाईलमध्ये दिसत आहे. तुझा हा आगळावेगळा अवतार पाहून जिमवाले सुद्धा हैराण होत असतील अशी खिल्ली तिची उडवली जात आहे. राखी जिममधून बाहेर येत असताना तिला वृत्तमाध्यमांनी घेरलं अन् तिच्या नव्या हेअरस्टाईल बद्दल सवाल केले. यावर राखीने या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत माझं वजन कमी होतंय का? असा सवाल उपस्थित पत्रकारांना विचारला. यावर त्यापैकी एकानं आता वजन कमी करून काय करणार? तुझं वय तर निघून गेलं आहे. असं म्हणत तिची खिल्ली उडवली. शिवाय तुझी हेअर स्टाईल पाहून जिमवाले देखील हैराण होत असतील ना? असा सवाल तिला केला. राखीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आई-बाबा मला पॉर्न स्टार समजत होते; Bigg Boss मधून एग्जिट घेणाऱ्या अभिनेत्रीचा भयावह अनुभव
राखीचं खरं नाव नीरु भेदा असं आहे. रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी तिने आपलं नाव बदललं. तिचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. आर्थिक टंचाईमुळे तिला पुरेसं शिक्षण घेता आलं नाही. लहान वयातच घराची आर्थिक जबाबदारी तिला सांभाळावी लागली. वयाच्या १३ वर्षी पेन कंपनीत काम करुन ती घराचा खर्च भागवायची. लहानपणापासूनच राखीला नृत्याची खूप आवड होती. गणेशोत्सव, दिवाळी, नवरात्र अशा सणांच्या निमित्तानं आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांमध्ये राखी भाग घेत असे. अन् तिथूनच तिच्या करिअरची सुरुवात झाली. 1997 साली ‘अग्निचक्र’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये तिने आयटम सॉन्गवर डान्स केला.