जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Antara srivastav: राजू श्रीवास्तव यांच्या मुलीला मिळालाय राष्ट्रीय शौर्य पुरस्कार, कारणही आहे खास

Antara srivastav: राजू श्रीवास्तव यांच्या मुलीला मिळालाय राष्ट्रीय शौर्य पुरस्कार, कारणही आहे खास

Antara srivastav: राजू श्रीवास्तव यांच्या मुलीला मिळालाय राष्ट्रीय शौर्य पुरस्कार, कारणही आहे खास

राजू श्रीवास्तव यांची मुलगी अंतरा श्रीवास्तव (Antara srivastav) चर्चेचा विषय ठरत आहे. अंतराचं चर्चेत येण्यामागचं कारणंही काही खास आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 19 ऑगस्ट : प्रसिद्ध आणि लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव (raju srivastav Health Update) सध्या रुग्णालयात दाखल आहेत. त्यांना मागच्या काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याने ताबडतोब रुग्णालयात दाखल केलं होतं. तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीविषयी वेगवेगळी माहिती समोर येत आहे. सध्या राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. अशतच राजू श्रीवास्तव यांची मुलगी अंतरा श्रीवास्तव (Antara srivastav) चर्चेचा विषय ठरत आहे. अंतराचं चर्चेत येण्यामागचं कारणंही काही खास आहे. राजू श्रीवास्तव यांची मुलगी अंतरा श्रीवास्तवला वयाच्या 12 वर्षी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळाला होता. यामुळेच सध्या अंतरा चर्चेचा विषय ठरत आहे. खूप कमी जणांना माहित आहे की अंतराला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळाला होता. अंतरानं 12व्या वर्षी आपल्या आईला चोरांपासून वाचवलं होतं. कमी वयात बुद्धी आणि समजूतदारपणा दाखवत आईला वाचवलं शिवाय घरात चोरी होण्यापासूनही रोखलं यामुळे तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हेही वाचा -  Katrina Kaif Pregnancy: कतरिना-विकी बनणार आईबाबा? ‘कॉफी विथ करण’मध्ये गुड न्यूज देण्याची शक्यता राजू श्रीवास्तव यांच्या घरात एके दिवशी चोरांनी प्रवेश केला होता. त्यावेळी घरात अंतरा आणि तिच्या आईशिवाय कोणीच नव्हते. चोरांकंडे बंदूक होती त्यांनी अंतराच्या आईला पकडलं आणि त्यांच्यावर बंदूक दाखवली. मात्र अंतरा कशीतरी बेडरूममध्ये पोहोचली आणि तिने वडिलांना आणि पोलिसांना फोन करुन बोलावलं. एवढेच नाही तर अंतराने बेडरूमच्या खिडकीतून वॉचमनला फोन करून तात्काळ पोलिसांना आणण्यास सांगितले होते. त्यानंतरच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी चोरट्यांना पकडून घर आणि आई दोघांनाही वाचवले.

News18

2006 मध्ये तिच्या शौर्य आणि समजुतीसाठी राष्ट्रीय शौर्य पुरस्कारही मिळाला होता. अंतरा आता 28 वर्षांची आहे. ती फ्लाइंग ड्रीम एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड मध्ये सहाय्यक निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून काम करते. दरम्यान, गेल्या बऱ्याच दिवसांपासून वडिल राजू श्रीवास्तव यांची प्रकृती ठीक नसल्यानं ती वडिलांची काळजी घेत आहे. श्रीवास्तव यांचे चाहते सध्या त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत. ट्विटरपासून अगदी सगळ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्यासाठी प्रार्थना केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात