मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

राजकुमार रावने लग्नात पत्नीसोबत केला होता जबरदस्त डान्स; आता फोटो शेअर करत म्हणाला...

राजकुमार रावने लग्नात पत्नीसोबत केला होता जबरदस्त डान्स; आता फोटो शेअर करत म्हणाला...

राजकुमार राव  (Rajkumar Rao)-   पत्रलेखाच्या   (Patralekaa)   लग्नाच्या फोटोंनी   (Wedding Photos) सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत. या जोडप्याने त्यांच्या विवाह सोहळ्यात खूप छान वेळ घालवला आहे. या सुंदर क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 25 नोव्हेंबर- राजकुमार राव  (Rajkumar Rao)-   पत्रलेखाच्या   (Patralekaa)   लग्नाच्या फोटोंनी   (Wedding Photos) सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत. या जोडप्याने त्यांच्या विवाह सोहळ्यात खूप छान वेळ घालवला आहे. या सुंदर क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता राजकुमारच्या नव्या  इंस्टाग्राम पोस्टवरून   (Instagram Post)   हे सिद्ध होते की त्याने आणि पत्रलेखाने एकत्र खूप धम्माल केली आहे. लग्नाच्या कार्यक्रमादरम्यान राजकुमारने जो फोटो शेअर केला आहे. त्यात तो पत्रलेखासोबत खुलेपणाने नाचताना दिसत आहे.

राजकुमार रावने आपल्या इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत राजकुमार आणि पत्रलेखा पांढऱ्या रंगाच्या पोशाखात नाचताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये राजकुमार निळ्या रंगाच्या पोशाखात नाचताना दिसत आहेत आणि त्याच्या मागे पत्रलेखा पांढऱ्या रंगाच्या पोशाखात नाचताना दिसत आहे. हे फोटो शेअर करत राजकुमार रावने लिहिले की, "असं नाचा जसं उद्याचा दिवस येणारच नाही'.

राजूकमार आणि पत्रलेखा यांनी 15 नोव्हेंबरला चंदीगडमधील 'द ओबेरॉय सुखविलास स्पा रिसॉर्ट' या लक्झरी रिसॉर्टमध्ये लग्नगाठ बांधली आहे. राजकुमार आणि पत्रलेखा सब्यसाचीने डिझाइन केलेल्या त्यांच्या लग्नाच्या पोशाखांमध्ये परफेक्ट दिसत होते. लग्नानंतर राजकुमारने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ त्याच्या लग्नाच्या दिवसाचा आहे.तसेच या दोघांनीही लग्नानंतर आपल्या लग्नाचे फोटो शेअर करत एकमेकांसाठी खास पोस्ट लिहिली होती.

11वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लग्न-

व्हिडिओमध्ये राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंद दिसत आहे. यामध्ये वधू बनलेली पत्रलेखा मंडपाच्या दिशेने जाताना दिसत आहे, तर राजकुमार राव शिट्टी वाजवून तिचे स्वागत करताना दिसत आहे. पत्रलेखाही हाताने हृदय बनवून पॅव्हेलियनकडे जाताना दिसत आहे. मंडपातील पत्रलेखा म्हणते, 'राज, 11 वर्षे झाली, पण मला असे वाटते की मी तुला आयुष्यभर ओळखत आहे. फक्त या आयुष्यापासूनच नाही तर मला खात्री आहे की हा साथ अनेक जन्मांपासूनचा आहे.

असं वाटतं आताच डेटिंग सुरु केलंय-

त्याचवेळी, राजकुमार राव व्हिडिओमध्ये म्हणतो, 'खरं सांगू, 10-11 वर्षे झाली आहेत. परंतु तरीही असे वाटते की आम्ही नुकतेच डेटिंग सुरू केले आहे. आम्हाला फक्त एकमेकांची सोबत खूप आवडते. आम्हाला वाटले की ते करूया. चला नवरा-बायको बनूया.'' व्हिडिओमध्ये पुष्पहार सोहळ्यानंतर दोघेही एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. यासोबतच दोघेही हसत हसत फेरे घेताना दिसत आहेत. व्हिडिओच्या शेवटी राजकुमार राव पत्रलेखाच्या भांगेत सिंदूर भरताना दिसतो.

First published:

Tags: Entertainment, Rajkumar rao