मुंबई, 23 नोव्हेंबर: आधी वडील आणि मग 9 वर्षाचा मुलगा देवराजच्या निधनामुळे प्रसिद्ध कॉमेडियन राजीव निगमवर (Rajiv Nigam) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राजीवच्या वाढदिवसाच्या दिवशीच देवराजचा मृत्यू झाला होता. राजीव प्रचंड आर्थिक अडचणीतही सापडला होता. आपल्या आयुष्यातील कठीण प्रसंगांबद्दल बोलताना राजीव म्हणतो, माझ्या पडत्या काळाता मला इंडस्ट्रीमधील कोणीही मदत केली नाही. फक्त मनीष पॉल (Manish Paul) हा असा एक माणूस होता जो माझ्या मदतीला धावून आला. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये तो म्हणाला होता, ‘गेल्या अडीच वर्षांपासून मी आर्थिक संकटामध्ये होतो. मी काम करुन पैसेही मिळवू शकत नव्हतो. माझ्या मुलावर उपचार सुरू होते.’
मनीष पॉलव्यतिरिक्त कोणीही मदत केली नाही
राजीव निगम म्हणाला, ‘खरं सांगायचं तर माझ्या आयुष्यात आलेल्या खडतर वेळेला माझ्या मागे कोणीही उभं राहिलं नाही. फक्त मनीष पॉलने मला आर्थिक सहाय्य केलं. माझ्या पाठिशी तो सदैव उभा होता. राजीव निगम यांनी मुलाच्या मृत्यूची माहिती इन्स्टाग्रामवर पोस्ट करत दिली होती.’ या पोस्टमध्ये त्यांनी लिहीलं होतं की, ‘वाढदिवसाच्या दिवशी असं गिफ्ट कोणी देतं का? माझ्या वाढदिवसाचा केक न कापताच माझा मुलगा मला सोडून गेला.’
2 वर्ष मुलगा व्हेंटिलेटरवर होता
देवराज निगम हा 9 वर्षाचा मुलगा तब्बल 2 वर्ष व्हेंटिलेटरवर होता. 2018 मध्ये राजीवने आपल्या मुलाबद्दल ही माहिती दिली होती. अंधेरीतल्या लोखंडवाला इथे राहत्या घरी राजीवच्या मुलाने अखेरचा श्वास घेतला. राजीवने आत्तापर्यंत ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ या मालिकेत काम केले आहे. तसेच कॉमेडी सर्कस के अजूबे, कॉमेडी सर्कस का जादू, कॉमेडी सर्कस के सुपरस्टार, ये तो होना ही था अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Stand up comedy