जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / काठी टेकत राजीव कपूर यांच्या अंत्यदर्शनाला आलेले हे आजोबा नक्की कोण? अनेकांच्या माना वळल्या

काठी टेकत राजीव कपूर यांच्या अंत्यदर्शनाला आलेले हे आजोबा नक्की कोण? अनेकांच्या माना वळल्या

काठी टेकत राजीव कपूर यांच्या अंत्यदर्शनाला आलेले हे आजोबा नक्की कोण? अनेकांच्या माना वळल्या

अभिनेते राजीव कपूर यांच्या अंत्यदर्शनाला अनेक बडे लोक आले होते. मात्र त्यातही या वयोवृद्ध गृहस्थांनी लोकांचं लक्ष वेधून घेतलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 फेब्रुवारी : कपूर घराण्यातील कलावंत आणि बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते (bollywood actor) राजीव कपूर (Rajiv Kapoor) यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या अंत्यदर्शनाला (Homage) कपूर कुटुंबातील सदस्यांसह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीजची गर्दी लोटली. सगळेच शोकाकूल झाले होते. यात एक अनोळखी चेहऱ्याची व्यक्ती सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती. कंबरेत वाकलेले हे जख्ख म्हातारे (old) गृहस्थ आहेत तरी कोण हे कुतूहल सगळ्यांनाच वाटत होतं. या गृहस्थांचं वय होतं थेट 94 वर्ष! डोक्यावर शुभ्र पांढरे विरळ केस, एका हातात गच्च धरलेली काठी, तोंडावर मास्क आणि थरथरत हळूहळू टाकली जाणारी पावलं. गर्दीत या गृहस्थांनी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. या वयात एकट्यानं अंत्यदर्शनाला आलेल्या या गृहस्थांचं नाव आहे विश्व मेहरा (Vishwa Mehra). विश्व मेहरा आणि कपूर कुटुंबीय यांचे ऋणानुबंध खूप जुने आहेत. आर. के. स्टुडिओचे व्यवस्थापक म्हणून जुन्या काळात विश्व मेहरा कार्यरत होते. याशिवाय अभिनेता म्हणूनही कधीकाळी त्यांनी ठसा उमटवलेला आहे. ‘जब जब फूल खिले’, ‘आवारा’, ‘प्रेम ग्रंथ’ अशा गाजलेल्या सिनेमांमधून त्यांनी भूमिका केलेल्या आहेत.

जाहिरात

विशेष म्हणजे राज कपूर(Raj Kapoor), शशी कपूर, (Shashi Kapoor) शम्मी कपूर यांचे नात्याने ते मामा (uncle) आहेत. बॉलिवूडमध्ये अनेकजण त्यांना ‘मामा’ म्हणूनच ओळखतात. हेही वाचा - ‘मला खूप वेदना होत आहेत’, राजीव कपूर यांच्या निधनाने हळहळली मराठमोळी अभिनेत्री विश्व मेहरा यांनी कपूर कुटुंबाच्या तीन पिढ्यांसोबत काम केलेलं आहे. एक मोठा काळाचा पट साक्षीदार म्हणून या माणसानं अनुभवलेला आहे. सगळ्या कपूर कुटुंबाच्या सुखदुःखाच्या क्षणांमध्ये ते सोबत राहिलेले आहेत. साहजिकच राजीव यांच्या निधनाचं वृत्त ऐकून त्यांना राहवलं नाही. अंतिम दर्शन घेत त्यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी राजीव कपूर यांना अखेरचा निरोप दिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात