जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘मी केवळ सलमान खानचा फॅन’; Marval बाबात प्रश्न विचारताच राहुल वैद्य संतापला

‘मी केवळ सलमान खानचा फॅन’; Marval बाबात प्रश्न विचारताच राहुल वैद्य संतापला

‘मी केवळ सलमान खानचा फॅन’; Marval बाबात प्रश्न विचारताच राहुल वैद्य संतापला

“मी एखाद्या पक्ष्याप्रमाणं भरारी घेऊ शकलो याचं सर्व श्रेय इंडियन आयडॉल आणि बिग बॉस या दोन्ही कार्यक्रमांना जातं.” राहुल वैद्यनं दिला जुन्या आठवणींना उजाळा

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई 20 मार्च: बिग बॉस 14 (Big Boss 14) सिझनचा पहिला उपविजेता गायक राहुल वैद्य (Rahul Vidya) विविध कारणांनी सातत्यानं चर्चेत असतो. शुक्रवारी राहुल ऊर्फ आरकेव्हीने ट्विटरवरील (Twitter) फॉलोअर्सशी ‘आस्क मी एनिथिंग’ (Ask me Anything) या सेशनच्या माध्यमातून थेट संवाद साधला. मी एखाद्या पक्ष्याप्रमाणं भरारी घेऊ शकलो याचं सर्व श्रेय इंडियन आयडॉल आणि बिग बॉस या दोन्ही कार्यक्रमांना जातं असं तो म्हणाला. यावेळी अनेक चाहत्यांनी त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी राहुल यानं त्याच्या बिग बॉसमधील सहकारी अली गोनी (Aly Goni) आणि जास्मिन भसीन (Jasmin Bhasin) यांच्याविषयी तसेच गर्लफ्रेंड दिशा परमार (Disha Parmar) हिच्या समवेत केलेल्या डबल डेटविषयी भाष्य केलं.

    जाहिरात

    एका ट्विटर युझरनं राहुलला विचारलं की तुम्ही तुमची ‘बिग बॉस 14’ मधील स्पर्धक आणि आताची चांगली मैत्रिण जॅस्मीन भसीन हिला बंटी का म्हणता, यावर राहुल म्हणाला, “की ती जेव्हा मेकअप करुन चालू लागते तेव्हा ती क्यूट सरदार बॉयसारखी वाटते म्हणून मी तिला बंटी म्हणायला सुरुवात केली.”

    तुझं एखादं वैशिष्ट्य किंवा विशेष कौशल्य सांग असं एका युझरनं विचारलं असता राहुल म्हणाला, “मी चटकन माणूस ओळखतो आणि बहुतेकवेळा माझा अंदाज अचूक असतो. बिग बॉस 14मधील अन्य स्पर्धकांविषयी मी जे बोललो होतो ते आता खरं होताना दिसतंय. तू 10 वर्षांनंतर कुठं असशील या प्रश्नाला त्यानी उत्तर दिलं, “मी 10 वर्षांनंतर स्वतः विवाहित आणि आयुष्यात सेटल झालेला असेन. एका प्रश्नाच्या उत्तरात त्यानी ट्विट केलंय की, ‘आतापर्यंत उत्तम वडील, ग्रेट पती ठरलोय आणि भारतीय असल्याचा मला अभिमान आहे. माझ्या देशासाठी सातत्यानं काहीतरी करण्याची माझी इच्छा आहे. तुझी एखादी इच्छा जी लवकरच पूर्ण व्हावी” असं वाटतं ती सांग म्हटल्यावर राहुलने ट्विट केलं, मला एका मुलीचा बाप व्हावं असं वाटतं. आणि मुली या सर्वोत्तम असतात. तुम्ही Marvel किंवा DC कशाचे फॅन आहात असं विचारलं असता, राहुलनं सलमान खान (Salman Khan) आणि शाहरुख खान (Shahrukh Khan) यांच्यावरील आपलं प्रेम व्यक्त केलं. मला माफ करा, Marvel आणि DC याच्याबद्दल मला जास्त माहिती नाही. मी माझ्या देशातील चित्रपट संस्कृती आणि चित्रपट ताऱ्यांचा मोठा फॅन आहे. असं सांगत त्यानं @BeingSalmanKhan आणि @iamsrk असं व्टिट केलं. तो आणि त्याची गर्लफ्रेडं दिशा बिग बॉस 14 मधील सहकारी अली गोनी आणि जॅस्मिन भससीन यांच्यासोबत डबल डेटवर गेले होते असंही राहुलने सांगितलं आणि भविष्यात अशा अनेक डेट्स बाकी असल्याचं स्पष्ट केलं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात