मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /राहुल रॉयच्या प्रकृतीमध्ये सुधारणा; VIDEO द्वारे फॅन्सना म्हणाला...

राहुल रॉयच्या प्रकृतीमध्ये सुधारणा; VIDEO द्वारे फॅन्सना म्हणाला...

अभिनेता राहुल रॉयच्या (Rahul Roy) तब्येतीत आता सुधारणा होत आहे. त्याचा हॉस्पिटलमधील एक व्हिडीओ समोर आला आहे.

अभिनेता राहुल रॉयच्या (Rahul Roy) तब्येतीत आता सुधारणा होत आहे. त्याचा हॉस्पिटलमधील एक व्हिडीओ समोर आला आहे.

अभिनेता राहुल रॉयच्या (Rahul Roy) तब्येतीत आता सुधारणा होत आहे. त्याचा हॉस्पिटलमधील एक व्हिडीओ समोर आला आहे.

मुंबई, 06 डिसेंबर: अभिनेता राहुल रॉय (Rahul Roy) सध्या मुंबईच्या नानावटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. कागरिल सिनेमाच्या शूटिंगदरम्यान राहुलला अचानक ब्रेन स्ट्रोक झाल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मीडिया रिपोर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार समोर आलं आहे की, राहुल रॉयला ICU मधून आता जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. डॉक्टरांनी आता राहुलला फिजिओथेअरपी देण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान राहुलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राहुल रॉयचा नवा व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये राहुल रॉय हसताना दिसत आहे, आपल्या चाहत्यांना सांगत आहे की मी ठीक आहे. हा व्हिडीओ हॉस्पिटलमध्ये रेकॉर्ड केलेला आहे. ब्रेन स्ट्रोकमुळे राहुलला बोलायला त्रास होत आहे. त्याला आपल्या तब्येतीबद्दल बोलणंही अवघड जात होतं.

View this post on Instagram

A post shared by ETimes (@etimes)

राहुल रॉयच्या मेंदूच्या डाव्या भागात रक्ताच्या गुठळ्या झाल्या आहेत. तो. 'LAC-लिव्ह द बॅटल' या चित्रपटाचं शूटिंग खूप उंचीवर सुरू होतं. त्यामुळे तेथे ऑक्सिजनची कमतरता होती आणि टीम सदस्यांनाही श्वास घेण्यात त्रास जाणवत होता.

राहुल रॉय याने 1990 साली 'आशिकी' चित्रपटाद्वारे पदार्पण केले. या चित्रपटामुळे त्यांना इतकी लोकप्रियता मिळाली की त्याने यानंतर थेट 47 चित्रपट साईन केले. पण 'आशिकी' नंतर राहुल रॉयची जादू कमी झाली. आणि तो प्रसिद्धीपासून दूरावला. यानंतर बिग बॉसचा सिजन 1 जिंकल्यानंतर तो पुन्हा चर्चेत आला. मात्र, बिग बॉसनंतरही त्यांची जादू फार चालू शकली नाही.

First published:
top videos

    Tags: Bollywood