सुपरस्टार सलमान खानच्या (Salman Khan) राधे: यूअर मोस्ट वॉटेंड भाई (Radhe: Your Most Wanted Bhai) या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. या सिनेमाबद्दल सर्वांच्याच मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. राधे सिनेमाबद्दल एक गंमतीशीर बाब समोर आली आहे. या सिनेमामध्ये दिशा पटानीच्या भावाची भूमिका जॅकी श्रॉफ करणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ‘जॅकी आणि दिशा यांनी या आधीही काम केलं होतं. पण त्यांचा एकत्र सीन नव्हता.’ एकीकडे दिशा आणि टायगरच्या रिलेशनची चर्चा असताना दुसरीकडे सिनेमात त्याच्याच वडिलांसोबत दिशा स्क्रीन शेअर करत आहे.
सलमान खानच्याच भारत सिनेमामध्ये दिशा आणि जॅकी श्रॉफ पहिल्यांदा एकत्र झळकले होते. आता दिशा पटानी आणि जॅकी श्रॉफला एकत्र पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, ‘देशभरातील सिनेमागृह चालकांनी सलमान खानला पत्र लिहून विनंती केली आहे की, राधे सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर नाही तर सिनेमागृहात प्रदर्शित करावा.’
पण नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानने आधीच त्याचा सिनेमा OTT प्लॅटफॉर्मला विकला आहे. या सिनेमाने प्रदर्शनाआधीच 230 कोटी रुपये कमवले आहेत. कोरोना काळातला हा सर्वात महागडा सौदा आहे.