मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी Good News! 'या'दिवशी 'पुष्पा 2' च्या शूटिंगला होणार सुरुवात

अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी Good News! 'या'दिवशी 'पुष्पा 2' च्या शूटिंगला होणार सुरुवात

अल्लू अर्जुन

अल्लू अर्जुन

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या 'पुष्पा' या चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे. त्यानंतर चाहत्यांना 'पुष्पा 2' ची प्रतीक्षा लागून आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 28 सप्टेंबर-   साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या 'पुष्पा' या चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे. त्यानंतर चाहत्यांना 'पुष्पा 2' ची प्रतीक्षा लागून आहे. पुष्पा 2 च्या मुहूर्ताच्या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये उत्सहाचे वातावरण निर्माण झाले होते. आता, सुपरस्टार त्याच्या चित्रीकरणाला कधी सुरूवात करणार हे जाणण्यासाठी चाहते उत्सुक होते.

प्रेक्षकांमध्ये त्याची इतकी क्रेझ आहे की सोशल मीडियावर अनेक गाणी, सीन्स आणि त्याचे मोनोलॉग्स ट्रेंड होऊ लागले आहेत. संपूर्ण वातावरण 'पुष्पा'मय झाले असून मुलांमध्ये चित्रपटाच्या सामी सामी आणि श्रीवल्लीवर नृत्य करण्याची जणू स्पर्धाच सुरु आहे. तर प्रौढांनी अल्लूच्या चालण्याची स्टाईल आणि शैली जशी च्या तशी स्वीकारली आहे. एकूणच पुष्पाची उत्कंठा शिगेला पोहोचलेली असताना, त्याच्या सिक्वेलची धमाकेदार घोषणा होणे, ही त्याच्या चाहत्यांसाठी एकप्रकारची मेजवानीच म्हणावी लागेल.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, अल्लू अर्जुन लवकरच पुष्पा 2 च्या चित्रीकरणास सुरुवात करणार आहे. "साधारण ऑक्टोबरच्या मध्यापासून अल्लू अर्जुन "पुष्पा 2" च्या चित्रीकरणास सुरुवात करेल आणि लवकरच त्याचा नवा लुक दर्शकांसमोर येईल. "पुष्पा" स्टार यासाठी प्रचंड मेहनत घेत असून "पुष्पा 2" ची तयारी जोरात सुरु आहे. सूत्रांच्या म्हणण्यातील खरे खोटे माहित नसले तरी अल्लू अर्जुनच्या "पुष्पा 2" च्या चित्रीकरणाची सुरुवात ही बातमी देशभरात एखाद्या सणासारखी साजरी होईल हे नक्की. अभिनेत्याचा नवा लुक एका नव्या अंदाजात सादर होणार असून जगभरातील प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात आहेत, यात शंका नाही.

आज अल्लू अर्जुन एक ग्लोबल आयकॉन आहे. या पॅन इंडिया स्टारने जागतिक स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. अल्लूची न्यूयॉर्कमधील वार्षिक इंडियन डे परेडमध्ये ग्रँड मार्शल म्हणून निवड झाली होती. अभिनेत्याने भारताची ध्वजा आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावली आहे. दरम्यान अल्लू अर्जुन सतत इंटरनेटवर चर्चेत असून तो सर्वत्र ट्रेंड करत आहे. त्याच्या चाहत्यांमध्ये अल्लू अर्जुनची जबरदस्त क्रेझ असून या गणेशोत्सवाच्या काळात त्याच्या "पुष्पा" पात्राने सर्व गणेश मंडळांवर अधिराज्य गाजवले होते. येत्या काळात "पुष्पा 2" मधून अल्लू अर्जुन आणखी काय नवीन घेऊन येणार आहे हे पाहणं रोमांचक ठरणार आहे.

(हे वाचा:Alia-Ranbir: कन्स्ट्रक्शन साईटवर प्रेग्नंट आलियासाठी रणबीरने केलं असं काही; VIDEO जिंकेल तुमचं मन )

दरम्यान चाहते रश्मिका मंदनाबाबतदेखील उत्सुक आहेत. ती या चित्रपटात दिसणार की नाही अशी भीती प्रेक्षकांच्या मनात होती. परंतु मध्यंतरी एका ट्विटद्वारे रश्मिकाने 'पुष्पा २'चा भाग असल्याची हिंट दिली होती. त्यामुळे तिचेही चाहते प्रचंड आनंदी आहेत. आणि या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहात आहेत.

First published:

Tags: Allu arjun, Entertainment, Rashmika mandanna