मुंबई, 27 फेब्रुवारी- सिमी गरेवाल (Simi Garewal) यांनी इन्स्टावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रियांका चोप्राचा (Priyanka Chopra) वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. प्रियांकाने यावेळी एका घटनेबद्दल सांगितले की, तिनं अभिषेक बच्चनचा मोबाईल (Abhishek Bachchan) चोरला होता. ती म्हणाली की, पहिल्यांदा अभिषेकने माझा फोन चोरला होता. मात्र ही गोष्ट तो जास्त काळ लपवू शकला नाही कारण त्याला बाहेर जायचे होते.
प्रियांकाने सांगितलं आहे की, तिनं अभिषेकच्या फोनवरून एका व्यक्तीला मेसेज केला होता. मला तुझी आठवण येत आहे, तू कुठे आहेस ? असा मेसेज प्रियांकाने केला होता. प्रियाकनं याबद्दल सांगितल्यानंतर सिमी म्हणाल्या की, तो मेसेज राणी मुखर्जी (Rani Mukerji) यांनी पाठवला होता.
वाचा-सलमाननं पूजा हेगडेसोबत डान्सच्यामध्ये केलं असं.., video वर चाहते भडकले
राणीनं देखील दिलं होतं मेसजचे उत्तर
विशेष म्हणजे अभिषेकच्या या मेसेजला राणीनं देखील उत्तर दिलं होते. राणी मुखर्जीनं मेसेमध्ये म्हटलं होत की, हाय एबी, तुझ्यासोबत नेमका काय गोंधळ झाला आहे. या व्हिडिओच्या शेवटी प्रियांका जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे की, याबद्दल सिमी यांनी कोणी माहिती दिली.
वाचा-टांझानियनातील भाऊ-बहिणीच्या गाण्याची PM मोदींना भुरळ, म्हणाले...
सिमी यांना या घडलेल्या प्रकारबद्दव पहिल्यापासूनच होते माहित
सिमी यावेळी म्हणाल्या की, मी खूप जणांना ओळखते. यावरून प्रियांकाने अंदाजा लावला की, ती व्यक्ती अभिषेक बच्चन असु शकते. या व्हिडिओवर कमेंट करत चाहते प्रेम व्यक्त करत आहेत.
View this post on Instagram
प्रियांका आणि अभिषेकने ‘ब्लफमास्टर’ सिनेमात केले आहे एकत्र काम
प्रियांका आणि अभिषेकने ‘ब्लफमास्टर’ सिनेमात एकत्र काम केले आहे. अभिषेकने राणी मुखर्जीसोबत ‘युवा’, ‘बस इतना सा ख्वाब है’ यासारख्या सिनेमात काम केलं आहे. यासोबतच या जोडीनं ‘बंटी और बबली’ या सिनेमात काम केलं आहे. हा सिनेमा खूप हिट ठरला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Abhishek Bachchan, Entertainment, Marathi entertainment, Priyanka chopra, Rani Mukharjee