Home /News /entertainment /

मला सिनेमातून काढून टाकण्यात आलं होतं कारण... बॉलिवूडच्या घराणेशाहीवर बोलली प्रियांका

मला सिनेमातून काढून टाकण्यात आलं होतं कारण... बॉलिवूडच्या घराणेशाहीवर बोलली प्रियांका

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूडच्या घराणेशाहीचा मुद्दा खूपच चर्चेत आला आहे. याबाबत आता प्रियांका चोप्रानं सुद्धा तिचा अनुभव शेअर केला.

    मुंबई, 30 जून : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूडच्या घराणेशाहीचा मुद्दा खूपच चर्चेत आला आहे. अनेक मोठ्या सेलिब्रेटींवर यामुळे टीका सुद्धा झाली आहे. सोशल मीडियावरही स्टार किड्सवर सातत्यानं टीका होताना दिसत आहे. त्यानंतर अनेक आउटसायडर कलाकारांनी इंडस्ट्रीमधील त्यांचे अनुभव मांडत या ठिकाणी नेपोटीझममुळे स्टार किड्सना संधी कशाप्रकारे दिल्या जातात हे सुद्धा सांगितलं. नुकतंच प्रियांका चोप्रानं सुद्धा तिचा अनुभव शेअर केला. जेव्हा तिला एका सिनेमातून बाहेर करण्यात आलं होतं आणि त्यासाठी तू खूप रडली सुद्धा होती. प्रियांका चोप्रा मिड-डेला दिलेल्या मुलाखतीत नेपोटीझमवर बोलताना म्हणाली, या ठिकाणी प्रत्येक गोष्ट आहे. एका खानदानी कुटुंबात जन्माला येणं चुकीचं नाही. स्टार किड्सवर सुद्धा त्यांच्या कुटुंबाचं नाव पुढे नेण्याचं किंवा त्याला शोभेल असं काम करण्याचा दबाव असतो. प्रत्येक स्टारचा स्वतःचा प्रवास असतो. माझ्या वेळी मी बऱ्याच गोष्टींना सामोरी गेले. अनेक गोष्टी सहन केल्या. मला एका सिनेमातून अक्षरशः बाहेर काढून टाकण्यात आलं होतं. कारण सिनेमाच्या निर्मात्यानं माझी जागी दुसऱ्या कोणाची तर शिफारस केली होती. मी खूप रडले आणि पुढे गेले. शेवटी जे लोक यशस्वी होण्यासाठी बनलेले असतात ते कितीही संकटं आली तरीही यशस्वी होतातच.
    प्रियांका चोप्रानं दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. एवढंच नाही तर त्याही पुढे जात तिनं हॉलिवूडमध्येही काम केलं. ती शेवटची 'द स्काय इज पिंक' या बॉलिवूड सिनेमात दिसली होती. या सिनेमात फरहान अख्तर, झायरा वसीम आणि रोहित सराफ यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. लवकरच प्रियांकाचा 'द व्हाइट टायगर' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
    First published:

    Tags: Bollywood, Priyanka chopra

    पुढील बातम्या