मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

भर कार्यक्रमात प्रियांका चोप्राने केलं निक जोनसला किस; केमेस्ट्री पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

भर कार्यक्रमात प्रियांका चोप्राने केलं निक जोनसला किस; केमेस्ट्री पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

Priyanka Chopra Jonas

Priyanka Chopra Jonas

प्रियांका चोप्रा आणि निक जोनसन ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमातील एक व्हिडीओ समोर आला असून यामधील निक आणि प्रियांकाच्या लव्ह केमिस्ट्रीने लोकांचे लक्ष वेधून घेतलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 25 सप्टेंबर : बॉलिवूडची 'देसी गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा जोनस. प्रियांकानं बॉलिवूडप्रमाणेच हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. नुकतंच प्रियांका आणि निक जोनसन ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाले होते. निकसोबत त्याचे भाऊही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमातील एक व्हिडीओ समोर आला असून यामधील निक आणि प्रियांकाच्या लव्ह केमिस्ट्रीने लोकांचे लक्ष वेधून घेतलं.

न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये शनिवारी ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. सिटीझन फेस्टिव्हलमध्ये जोनस ब्रदर्सने उत्कृष्ट परफॉर्मन्स देऊन सगळ्यांचं मनोरंजन केलं. या कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडिओने लोकांचे लक्ष वेधून घेतलं असून तो इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये निक जोनस आणि प्रियांका सर्वांसमोर एकमेकांना किस करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये निक प्रियांकाची ओळख करुन देतानाही दिसला. यावेळी प्रेक्षकांशी बोलताना प्रियांका म्हणाली, 'मी दहा वर्षांपासून पाहत आहे हा उत्सव साजरा करत आहोत. तुमच्यामुळेच आज आम्ही इथे आहोत.'

दरम्यान, प्रियांका ग्लोबल सिटीझन इव्हेंटची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे हे 10 वे वर्ष आहे. चाहत्यांना प्रियांका आणि निकची बॉन्डिंग खूप आवडते. दोघांचे नेहमीच नवनवीन फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

First published:

Tags: Bollywood, Hollywood, Nick jonas, Priyanka chopra