जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / प्रियांका चोप्राने ख्रिसमसनिमित्त घातलेल्या जॅकेटची किंमत ऐकून तुम्हाला भरेल हुडहुडी

प्रियांका चोप्राने ख्रिसमसनिमित्त घातलेल्या जॅकेटची किंमत ऐकून तुम्हाला भरेल हुडहुडी

प्रियांका चोप्राने ख्रिसमसनिमित्त घातलेल्या जॅकेटची किंमत ऐकून तुम्हाला भरेल हुडहुडी

प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनस (Nick Jonas) सध्या शूटिंगनिमित्त लंडनमध्ये आहेत. तिने ख्रिसमसनिमित्त घातलेला कोट अतिशय महाग आहे. किंमत ऐकून तुमचा विश्वासही बसणार नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

लंडन, 26 डिसेंबर: सध्या ख्रिसमसची (Christmas) धूम सुरु आहे. संपूर्ण जगभरात अजूनही ख्रिसमसचे सेलिब्रेशन सुरु आहे. यामध्ये सामान्य नागरिकांपासून बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत (Bollywood Celibrity) सगळेच ख्रिसमस सेलिब्रेशन करत आहेत. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) देखील मागे नाही. आपल्या पतीसह ती ख्रिसमस साजरा करत आहे. याचे काही फोटो तिने इंस्टाग्रामवर(Instagram) शेअर केले आहेत. प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या पती निक जोनस (Nick Jonas) सह लंडनमध्ये(London) आहे. दोघेही एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनमध्ये असून या फोटोंमध्ये प्रियांका चोप्राच्या जॅकेटची जास्त चर्चा होताना दिसून येत आहे. प्रियांकाने शेअर केलेल्या फोटोत निक आणि प्रियांकाचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळत आहे. तिने फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांच्या विविध प्रतिक्रियादेखील येत आहेत. परंतु यामध्ये प्रियांका चोप्राने घातलेल्या व्हाईट कोटने (White Coat) सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोत प्रियांका आणि निक जोनास दोघेही दिसून येत असून प्रियांका चोप्राने खास आपल्या स्टाईलमध्ये मेकअप, गॉगल आणि व्हाईट कोट घातला आहे. या कोटची किंमत इतकी आहे की सामान्य माणूस याच किमतीत एखादी दुचाकी खरेदी करू शकेल. या फोटोत प्रियांकाने ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर खास ख्रिसमस ट्रीचे डिझाईन असलेलं गॉगल घातला असून व्हाईट कोटमुळे तिचं सौंदर्य अधिकच खुलत असून या फोटोत ती आणि निक खूपच सुंदर दिसत आहेत. निका जोनसने काळ्या रंगाचा कोट घातला असून त्याच रंगाची डेनिम जीन्स घातली आहे. तिच्या या कोटची किंमत 712.50 डॉलर असून भारतीय रुपयांमध्ये ही किंमत 52 हजार 600 रुपये असून Calina maxi कंपनीने हा कोट तयार केला आहे. हा कोट Mackage या कंपनीच्या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध असून तुम्ही देखील खरेदी करू शकता.

जाहिरात

सध्या प्रियांका व निक लंडनमध्ये आहेत. प्रियांका (Priyanka Chopra) तिथे ‘टेक्स फॉर यू’ या सिनेमाचे शूटिंग करत आहे.  तिच्यासोबत निकसुद्धा या सिनेमात दिसणार आहे. कामाच्या वेळेतून सुट्टी भेटल्यानंतर दोघेही लंडनच्या रस्त्यांवर भटकंती करत आहेत. या फोटोबरोबरच प्रियांकाने आपल्या आवडता कुत्रा पांडा याच्याबरोबरचा फोटो टाकत त्याला मिस यु असे कॅप्शन दिले होते. सध्या ती हॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून लवकरच ती ‘द व्हाइट टायगर’ या बॉलिवूड चित्रपटात देखील दिसणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर राजकुमार राव (Rajkumar Rao) दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी याचा ट्रेलर लाँच झाला आहे. कोरोनाच्या (covid19) या संकटामुळं हा चित्रपट देखील ऑनलाईन रिलीज होणार असून नेटफ्लिक्सवर (Netflix) हा चित्रपट पाहायला मिळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात