अभिनेत्री प्रिया बापट आणि उमेश कामत ही मराठी कलाविश्वातील एक सुप्रसिद्ध जोडी आहे. या जोडीच्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्याबाबत बऱ्यापैकी सर्वानांच माहिती आहे. मात्र आज एका फोटोमुळे चांगलीच चर्चा रंगली आहे. प्रियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एका चिमुकलीच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये अभिनेत्रीने त्या चिमुकलीला पाच वर्षांची झाल्याचं सांगत प्रेम व्यक्त केलं आहे. या फोटोवरुन काहींनी कमेंट करत तुम्हाला मुलगीसुद्धा आहे? ही कोण आहे? अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत. वास्तविक ती चिमुकली प्रियाच्या बहिणीची मुलगी आणि तिची लाडकी भाची आहे. प्रिया आपल्या भाचीच्या फारच जवळ आहे. तिला तिची प्रचंड ओढ आहे. प्रियाच्या भाचीचं नाव श्रीवा असं आहे.