शिवीगाळ केल्यानंतरही त्याला पाठिशी घातलं; मालिका सोडल्यानंतर प्राजक्ता गायकवाडचा खुलासा

माझी आई काळुबाई या मालिकेत मोठे बदल होणार आहेत. मालिकेची मुख्य अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि मालिकेच्या टीमच्या वादानंतर वीणा जगताप या मालिकेत मुख्य अभिनेत्री म्हणून झळकणार आहे.

माझी आई काळुबाई या मालिकेत मोठे बदल होणार आहेत. मालिकेची मुख्य अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि मालिकेच्या टीमच्या वादानंतर वीणा जगताप या मालिकेत मुख्य अभिनेत्री म्हणून झळकणार आहे.

  • Share this:
     मुंबई, 03 नोव्हेंबर:  माझी आई काळुबाई (Majhi Aai Kalubai) ही मालिका सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत होती. आधी सेटवरील अनेकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. आता या मालिकेतला एक वाद उघडकीस आला आहे. या वादामुळे  मालिकेत मुख्य भूमिका करणाऱ्या प्राजक्ता गायकवाड (Prajkta Gaikwad)ने ही मालिका सोडली आहे. मालिकेदरम्यान वेगवेगळ्या प्रकारचे वाद समोर आले आहेत. मालिकेच्या टीमचं म्हणणं काय? प्राजक्ता गायकवाड या अभिनेत्रीला आम्ही मालिकेतून नारळ दिला असं टीमचं म्हणणं आहे. "प्राजक्ताचं सेटवर उशिरा येणं, परीक्षेची कारणं देत वारंवार सुट्टया मागणं अशा कारणांमुळे प्राजक्ताला मालिकेतून काढून टाकण्यात आलं आहे" असं सांगण्यात येत आहे. मालिकेच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीच्या आईचा प्रमाणाबाहेर हस्तक्षेप होता असाही आरोप करण्यात आला आहे. प्राजक्ता गायकवाडची बाजू काय ? अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिनेही आपली बाजू मांडली आहे. ती म्हणाली की, “मालिकेच्या टीमशी संबंधित असलेल्या विवेक सांगळे या व्यक्तीने आम्ही एकत्र प्रवास करत असताना मला शिवीगाळ केली होती. ही गोष्ट मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल (Alka Kubal) यांच्या कानावर घातली परंतू त्यांनी या गोष्टीकडे फारसं लक्ष दिलं नाही. मला सीरिअलमधून काढून टाकण्यात आलं अशी चुकीची माहिती पसरवली जात आहे. उलट मी स्वत: सीरिअलला रामराम ठोकला आहे. सेटवर उशिरा पोहचण्याबद्दल बोलायचं झालं तर आम्ही सगळेजण मालिकेच्या सेटजवळच राहत असल्यामुळे सेटवर उशिरा पोहचण्याचा प्रश्नच नव्हता. माझी इंजिनिअरिंगची परीक्षा आहे अशी आगाऊ कल्पना मी दिली होती. तरीही आता या मुद्द्याचा विनाकारण बाऊ केला जात आहे." प्राजक्ताच्या जागी वीणाची एन्ट्री माझी आई काळूबाई या मालिकेत आता मोठे बदल होणार आहेत. प्राजक्ताच्या जागी अभिनेत्री वीणा जगताप(Veena Jagtap)ची एन्ट्री होणार आहे. 'राधा प्रेम रंगी रंगली' आणि 'बिग बॉस मराठी'मध्ये वीणा जगताप झळकली होती.
    Published by:Amruta Abhyankar
    First published: