Home /News /entertainment /

‘दया कुछ तो गडबड है...’ CID मालिका लवकरच बंद होणार

‘दया कुछ तो गडबड है...’ CID मालिका लवकरच बंद होणार

‘दया कुछ तो गडबड है’ असं म्हणत एसीपी प्रदुम्न एखाद्या प्रकरणाचा करत असलेला तपास प्रेक्षकांना खेळवून ठेवत असत.

    मुंबई, 23 ऑक्टोबर : प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा टीव्हीवरील लोकप्रिय शो ‘CID’ बाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सोनी टीव्हीवरील ‘CID’ ही मालिका लवकरच बंद होणार असल्याचं वृत्त आहे. ‘CID’चा शेवटचा एपिसोड 29 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार असल्याचं वृत्त ‘टेलीचक्कर’ या एंटरटेनमेंट वेब पोर्टलनं दिलं आहे. या शोमध्ये ‘दया कुछ तो गडबड है’ असं म्हणत एसीपी प्रदुम्न एखाद्या प्रकरणाचा करत असलेला तपास प्रेक्षकांना खेळवून ठेवत असत. प्रत्येक प्रकरणातील तपासाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचत असे. यामुळेच 1997 साली सुरू झालेला हा टीव्ही शो  21 वर्ष अनेकदा नंबर वन ठरला. नुकतंच ‘CID’ या मालिकेनं आपले 1546 एपिसोड पूर्ण केले आहेत.  या मालिकेत अभिनेते शिवाजी साटम हे एसीपी प्रद्युम्न, दयानंद शेट्टी हे इंस्पेक्टर दया आणि आदित्य श्रीवास्तव हे अभिजीतच्या भूमिकेत पाहायला मिळत. या मालिकेची खासियत म्हणजे मालिकेने अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील लोकांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली. ‘CID’चा एपिसोड सुरू असताना एखाद्याला टीव्हीसमोरून उठवणं म्हणजे महाकठीण काम. प्रेक्षकांना खेळवून ठेवण्याच्या याच कलेमुळे ही मालिका सुपरहिट ठरली. दरम्यान, शो बंद होण्याची बातमी येताच ‘CID’च्या प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तब्बल 21 वर्षांपासून या मालिकेसोबत काही प्रेक्षकांचं एक आपुलकीचं नातं तयार झालं होतं. असे प्रेक्षक ही मालिका नक्कीच मिस करतील. VIDEO: साताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंमध्ये पुन्हा जुंपली, तणावपूर्ण वातावरण
    First published:

    Tags: Sony tv, Tv show

    पुढील बातम्या