जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / भारतात होणार Justin Bieber चा लाईव्ह कॉन्सर्ट, पाहा किती असेल तिकिटाची किंमत

भारतात होणार Justin Bieber चा लाईव्ह कॉन्सर्ट, पाहा किती असेल तिकिटाची किंमत

भारतात होणार Justin Bieber चा लाईव्ह कॉन्सर्ट, पाहा किती असेल तिकिटाची किंमत

पॉप स्टार गायक जस्टिन बीबरच्या (Justin Bieber) भारतातील चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण या गायकाचा भारतात कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 मे-   पॉप स्टार गायक जस्टिन बीबरच्या  (Justin Bieber)  भारतातील चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण या गायकाचा भारतात कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला आहे. जस्टिन बीबर 18 ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथे ‘जस्टिस वर्ल्ड टूर’ करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तो दिल्लीतील (Justin Bieber Delhi Show) जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये आपला परफॉर्मन्स देणार आहे. ही माहिती समोर येताच जस्टिन बीबरच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. जस्टिनचे चाहते त्याच्या कॉन्सर्ट उत्सुक आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, ऑनलाइन तिकीट बुकिंग ब्रँड ‘बुक माय शो’ने जस्टिन बीबरच्या या कॉन्सर्टची अधिकृत घोषणा केली आहे. जस्टिन बीबरचा वर्ल्ड टूर या महिन्यापासून मेक्सिकोतून सुरू होत आहे. ऑक्टोबरमध्ये दिल्लीतील कॉन्सर्टपूर्वी जस्टिन बीबर दक्षिण अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेतही कॉन्सर्ट करणार आहे. दिल्लीत जस्टिन बीबरचा कॉन्सर्ट पाहण्यासाठी चाहते बुक माय शोच्या माध्यमातून तिकीट बुक करु शकतात. 2 जूनपासून तिकीट बुकिंग सुरू होणार आहे. जस्टिन बीबर तरुणांमध्ये फारच लोकप्रिय आहे. आपल्या देशातसुद्धा त्याचा एक विशेष चाहतावर्ग आहे. त्यामुळे त्याच्या कॉन्सर्टसाठी अनेकजण उत्सुक आहेत. हा कॅनेडियन गायक, ‘बेबी’, ‘सॉरी’, ‘घोस्ट’ आणि ‘लोनली’ सारख्या विविध लोकप्रिय ट्रॅकसाठी प्रसिद्ध आहे. हा कॉन्सर्ट ग्रुप 30 हून अधिक देशांमध्ये प्रवास करणार आहे. यादरम्यान तो 125 हून अधिक शो करणार आहे. त्यांचा ‘जस्टिस वर्ल्ड टूर’ मे 2022 ते मार्च 2023 पर्यंत चालेल. प्रमोटर्स Bookmyshow आणि AEG Presents Asia यांनी मंगळवारी ही माहिती दिली. भारतातील शोच्या तिकिटांची विक्री 4 जून 2022 रोजी IST दुपारी 12 वाजता BookMyShow वर सुरू होईल. तर प्री-सेल विंडो 2 जूनपासून सुरू होईल. या कॉन्सर्टच्या तिकिटांची किंमत रु.4,000 पासून सुरू होते.जस्टिनच्या भारतीय चाहत्यांसाठी ही एक मेजवानीच असणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात