पूनम पांडे नेहमीच तिच्या बोल्ड स्टाइलमुळे चर्चेत असते. तिचा ग्लॅमरस लूक सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. नुकतीच अभिनेत्री मुंबईत कॅफेमध्ये जाताना दिसली. यादरम्यानही तिचा बोल्ड लुक पाहायला मिळाला.
ज्याची युजर्समध्ये चर्चा सुरू झाली आहे. प्रसिद्ध फोटोग्राफर विरल भयानीने हे फोटो शेअर केले आहेत. सोशल मीडियावर सध्या हे फोटो व्हायरल होत आहेत.
पूनमने यामध्ये क्रॉप टॉप घातला होता. पूनम पांडेचा हा लूक पाहून यूजर्सनी तिच्या कपड्यांच्या निवडीवर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
पूनम पांडेचे लेटेस्ट फोटो पाहून काही जण तिची खिल्ली उडवत आहेत तर काही जण तिच्या फिटनेसचं कौतुक करत आहेत.
पूनम पांडेचा बोल्ड अवतार पाहिल्यानंतर एका यूजरने कमेंट करत लिहिले - 'ती जेनिफर लोपेज बनून फिरत आहे.'
तर एकाने तिच्या ड्रेसच्या चॉईसवर निशाणा साधत लिहिलं, 'हद्दच लोक फॅशनच्या नावाखाली काहीही घालून फिरतात'. तर आणखी एकाने लिहिलं, 'यावेळेत मुंबईमध्ये कपड्यांची कमतरता..?'