मुंबई, 2 जुलै : बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असलेली पहायला मिळते. तिच्या सिनेमांसोबतच ती तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. तिच्या याच स्वभावामुळे ती नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. अशात आता पूजा पुन्हा एकदा तिच्या एका बोल्ड फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. हा फोटो नुकताच तिनं तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आणि या फोटोला एक बिनधास्त कॅप्शन सुद्धा दिलं आहे.
पूजानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. ज्यात ती बाथटबमध्ये अंघोळ करताना दिसत आहे. या ब्लॅक अँड व्हाइट फोटोमध्ये पूजा खूपच बिनधास्त अंदाजात पाहायला मिळत आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. यासोबतच या फोटोचं कॅप्शन सुद्धा चर्चेचा विषय ठरलं आहे.
बाथटबमधील बोल्ड फोटो शेअर करताना पूजा भटनं लिहिलं, टीका? मला टीकेची भीती वाटत नाही. मी 90 व्या शतकापासूनच ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. पूजानं तिच्या कॅप्शनमधून टीकाकारांचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला आहे. या फोटोमध्ये पूजा एका हातात वाइन ग्लास पकडून बाथटबमध्ये दिसत आहे. तिच्या या फोटोवर आलिया भटची आई सोनी राजदान यांनी सुद्धा कमेंट केली आहे त्यांनी लिहिलं, 'लव्ह इट'
पूजा भट लवकरच 'सडक 2' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात आलिया भट, संजय दत्त आणि आदित्य रॉय कपूर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा सिनेमा डिजनीहॉटस्टार रिलीज होणार आहे. याबाबत बोलताना मुकेश भट म्हणाले, 'सडक 2' ओटीटी वर रिलीज करण्यापलिकडे माझ्याकडे काही पर्याय नाही. या सिनेमात पूजा भट अभिनेत्री तर आहेच पण ती या सिनेमाची निर्माती सुद्धा आहे.