**मुंबई, 25 जुलै-**सध्या सोशल मीडियावर फक्त एकच चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. ती म्हणजे सीमा आणि सचिनच्या लव्हस्टोरी, फिल्मी कथेला मागे टाकेल अशीच काहीशी यां दोघांची लव्हस्टोरी आहे. पण आता ही लव्हस्टोरी विसरा याहीपेक्षा एका भन्नाट लव्हस्टोरीची सोशल मीडियावर चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. मागच्या काही दिवसांपासून संपूर्ण देशात एका बातमीनं अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ती बातमी म्हणजे पाकिस्तानच्या सामिया रहमानची. पब्जी खेळताना सचिनची आणि तिची ओळख झाली आणि त्यांच्यात प्रेम झाले. सगळ्या नेटकऱ्यांना या दोघांच्या लव्हस्टोरीनं याडं लावलं आहे, यात भर म्हणून आता एक नवीन लव्हस्टोरी चर्चेत आली आहे. सध्या सोशल मीडियावर पोलंडच्या बारबराची आणि झारखंडच्या एका तरूणाच्या लव्हस्टोरीची चर्चा रंगलेली आहे. ती त्याच्यासाठी पोलंड सोडून भारतात आली आहे. आता तिला त्याच्याशीच संसार थाटायचा आहे. पोलंडच्या बारबराला एक मुलगी देखील आहे असे सांगितले जाते. या दोघांची लग्नाची चर्चा सोशल मीडियावर रंगलेली आहे.बारबरा तिच्या मुलीला घेऊन झारखंडमध्ये आली आहे. असे सांगण्यात आले आहे. वाचा- ‘तू बाई कमी बाप्या जास्त दिसतेस…’;सोशल मीडियावरील टीकेला अर्चनाचं सडेतोड उत्तर कशी झाली पहिली भेट? या दोघांची ओळख कशी झाली, प्रेम कसं झालं असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तर त्याचं झालं असं की, या दोघांची ओळख 2021 मध्ये इन्स्टाग्रावर झाली होती. त्यानंतर त्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. आता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. बारबरा पोलक ही तिची अनन्या सोबत आली आहे. बारबरा शादाब आलमसोबत लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. पाकिस्तानची सीमा आणि उत्तर प्रदेशातील सचिनच्या लवस्टोरीनं एकीकडे लक्ष वेधून घेतले असताना आता बारबराच्या बातमीनं पुन्हा एकदा वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे.
बारबरा ही युरोप खंडातील पोलंड देशाची राहणारी आहे. तर शादाब आलम हा कटकमसांडी मधील बरतुआ गावात राहणारा आहे. बारबरा तिच्या छोट्या अनन्यासोबत बरतुआमध्ये आली आहे. बरतुआ गावात पोलंडमधील बारबरा राहत असून ती आता सगळ्या गावामध्ये चर्चेचा विषय आहे.
शादाब आलमच्या गावात त्यांच्या लग्नाची जोरदार तयारी देखील सुरु झाली आहे. शादाबनं बारबरा आणि तिच्या मुलीचं नवं नामकरण केलं आहे. बारबराची मुलगी आतापासूनच त्याला डॅडी म्हणून हाक मारत आहे. तसेच बारबराला भारत आणि हजारीबाग खूप आवडत असल्याचे देखील तिनं सांगितलं आहे. आता या लव्हस्टोरीचं पुढे काय होतंय याबद्दल नेटकऱ्यांना उत्सुकता लागली आहे.