मुंबई, 1 मार्च : स्टार प्रवाह वाहिनीवर पिंकीचा विजय असो ही नवी मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मालिका कमी काळात प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण कराण्यास यशस्वी ठरली आहे. मालिकेत पिंकीची जितकी चर्चा असते तितकीच तिच्या साध्या आणि सरळ लहान बहीण निरीची ( sarika salunkhe ) देखील चर्चा असते. साधी दिसणारी निरी खऱ्या आयुष्य़ात कशी आहे याबद्दल सर्वांना जाणून घ्यायचे आहे. निरीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव सारिका साळुंके आहे. सारिका ही मूळची साताऱ्याची आहे. साताऱ्यात तिनं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं आहे. तसं पाहता मालिकेत येण्याआधी सारिकाचा सोशल मीडियावर चांगलाच बोलाबाला आहे. सारिका सोशल मीडिया स्टार आहे. सोशल मीडियावर तिचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात.
वाडीवरची स्टोरी, पक्के सातारी या वेबसिरीजमध्ये सारिकाने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहे. तिची शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील ही वेबसिरीज खूपच चर्चेत राहिली. यामुळेच तिला सोशल मीडियावर ओळख मिळाली. यानंतर तिला पिंकीचा विजय असो ही मालिका मिळाली. तिची ही पहिलीच मालिका आहे. मालिका पहिली असली तरी तिचा अभिनय कौतुक करण्यासारखा आहे. साधी सरळ निरी अभिनयाच्या जोरावर भाव खावून जाते. पिंकीचा विजय असो मालिकेचे चित्रीकरण सातारा जिल्ह्यातील वाईत सुरू आहे. त्यामुळे मालिकेने स्थानिक कलाकारांना अभिनयाची संधी मिळाली आहे. मालिकेत पिंकी, निरी आणि दिप्या हे अतरंगी भावंडं प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरले आहेत.
पिंकीचा विजय असो मालिका नीम की मुखीया या हिंदी मालिकेचा रिमेक असल्याचे दिसून येते. मालिकेतून नखरेल पिंकीची धमाल मस्ती प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. तिला बंटी, निरी आणि दिप्याची चांगली साथ मिळत आहे.