मुंबई, 30एप्रिल- बॉलिवूड (Bollywood) अभिनेता टायगर श्रॉफचा ‘हिरोपंती’ हा चित्रपट चांगलाच चालला होता. त्यांनतर आता टायगर हिरोपंती 2 (Heropanti 2) मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.दरम्यान 28 एप्रिलच्या रात्री हिरोपंती 2 चं स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आलं होतं. ज्यामध्ये बॉलिवूडमधील सर्व सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पाटनीही (Disha Patani) चित्रपटाच्या स्क्रिनिंगला पोहोचली होती. स्क्रीनिंगपूर्वी तिने पापाराझींसाठी पोजसुद्धा दिली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.यामध्ये अभिनेत्रींच्या हातात असणाऱ्या एका माचिस साईज बॅगने सर्वांनाचंच लक्ष वेधलं होतं. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, दिशा पाटनी लॅव्हेंडर आउटफिटमध्ये सुंदर दिसत आहे. परंतु ज्या गोष्टीने लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे ती गोष्ट म्हणजे तिची माचिस बॉक्सच्या आकाराची हँड बॅग. वास्तविक, अभिनेत्रीच्या हॅण्डबॅगचा आकार पाहून नेटकऱ्यांचं डोकं चक्रावलं आहे. दिशाने या इवल्याशा बॅगेत कोणतं सामान ठेवलं असावं, असा प्रश्न त्यांना पडला आहे.या व्हिडीओवर चाहते जबरदस्त कमेंट्स करत आहेत. अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर नेटकरी तुफान कमेंट करत आहेत. इतकंच नव्हे तर बॅगमुळे ते अभिनेत्रीची खिल्लीदेखील उडवत आहेत. एका युजरने कमेंट करत विचारलं आहे की, तिच्या बॅगेत पानपसाला आहे का? तर दुसऱ्याने लिहिलंय,‘त्यांच्या बॅगेत काय असू शकते?तर तिसऱ्याने एकाने लिहिलंय,‘दिशाच्या हातात कशाचं कुलूप आहे’. कारण त्या बॅगेचा आकार काहीसा तसा आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिशा पाटनीच्या या छोट्याशा बॅगची किंमत सुमारे 46 हजार रुपये आहे. अशा स्थितीत नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसणं साहजिक आहे. या बॅगची खासियत काय आहे? ज्यामुळे ती इतकी महाग आहे?असा प्रश्न लोकांना पडला आहे. दिशाच्या सुंदर ड्रेसनेही लोकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. दरम्यान काहींना अभिनेत्रीच्या चेहऱ्यात बदल जाणवला. अनेकांना अभिनेत्रीने लीप जॉब केल्याचं जाणवलं, त्यामुळे त्यांनी अभिनेत्रीला ट्रोलदेखील केलं आहे.