जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / शेहनाज गिलच्या या फोटोला Zoom करून पाहताहेत लोक, सिद्धार्थसोबत आहे कनेक्शन

शेहनाज गिलच्या या फोटोला Zoom करून पाहताहेत लोक, सिद्धार्थसोबत आहे कनेक्शन

शेहनाज गिलच्या या फोटोला Zoom करून पाहताहेत लोक, सिद्धार्थसोबत आहे कनेक्शन

गेल्या वर्षी बिग बॉस 13 चा (Bigg Boss 13 Winner) विजेता आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या (Sidharth Shukla) आकस्मिक निधनानंतर त्याच्या कुटुंबासह चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. या दुःखातून सावरणं सर्वानांच कठीण झालं होतं. तसेच शेहनाज गिलची (Shehnaaz Gill) सिद्धार्थसोबतची केमिस्ट्री लोकांना खूप आवडली होती. हे जोडपे पहिल्यांदा बिग बॉस 13 मध्ये भेटले होते. सीडच्या अचानक जाण्याने शेहनाज हादरली होती. त्यांनतर ती आता स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, शहनाज एयरपोर्टवर स्पॉट झाली. तिचे काही फोटो

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 एप्रिल- गेल्या वर्षी बिग बॉस 13 चा   (Bigg Boss 13 Winner)  विजेता आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या (Sidharth Shukla)  आकस्मिक निधनानंतर त्याच्या कुटुंबासह चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. या दुःखातून सावरणं सर्वानांच कठीण झालं होतं. तसेच शेहनाज गिलची  (Shehnaaz Gill)  सिद्धार्थसोबतची केमिस्ट्री लोकांना खूप आवडली होती. हे जोडपे पहिल्यांदा बिग बॉस 13 मध्ये भेटले होते. सीडच्या अचानक जाण्याने शेहनाज हादरली होती. त्यांनतर ती आता स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, शहनाज एयरपोर्टवर स्पॉट झाली. तिचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. शहनाजचे हे फोटो आणि व्हिडिओ पाहून ‘सिडनाज’चे चाहते शहनाजच्या मोबाईलचा वॉलपेपर पाहून भावुक झाले आहेत. शहनाज गिलचे काही लेटस्ट फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ‘सिडनाज’च्या एका चाहत्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरसुद्धा काही व्हिडीओ आणि फोटो शेअर करण्यात आले आहेत. ज्यामध्ये शेहनाजच्या मोबाईलचा वॉलपेपर स्पष्टपणे दिसून येत आहे. यामध्ये वॉलपेपरमध्ये ती सिद्धार्थ शुक्लाचा हात धरलेली दिसत आहे. वॉलपेपरमध्ये दोघांचे फक्त हात दिसत आहेत. हे पाहून चाहते पुन्हा एकदा भावुक होत आहेत.इन्स्टाग्रामवर शेहनाजचा वॉलपेपर शेअर करत लिहिलंय - “खरं प्रेम कधीच मरत नाही” सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल होताच ‘सिडनाज’ अर्थातच सिद्धार्थ आणि शेहनाजचे चाहते सतत कमेंट करत आहेत. शेहनाजचा वॉलपेपरवरील फोटो हृदय पिळवटून टाकणारा असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. शेहनाज आजही आपल्या प्रेमासाठी जगत असल्याचं चाहते म्हणत आहेत. शेहनाजचे हे फोटो आणि व्हिडीओ एयरपोर्टवरील आहेत. नुकतंच पापाराझींनी तिला एयरपोर्टवर स्पॉट केलं आहे. शेहनाज नुकतंच आपल्या घरी म्हणजेच पंजाबला गेली होती. यावेळी तिने सुवर्णमंदिरालादेखील भेट दिली. अभिनेत्रीने आपले काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सिद्धार्थ शुक्लाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. अभिनेता 40 वर्षांचा होता. सिद्धार्थ आणि शेहनाजने कधीही जाहीरपणे सांगितलं नाही की ते रिलेशनशिपमध्ये आहेत. पण दोघे अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते.त्यांची जोडी बिग बॉस 13 च्या घरातच झाली होती. या दोघांची हटके केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना प्रचंड पसंत पडत होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात