मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /कंगनाचं Twitter सस्पेंड झाल्यामुळं अभिनेत्रीला कोसळलं रडू; म्हणाली, ‘हिंदू असल्यामुळं...’

कंगनाचं Twitter सस्पेंड झाल्यामुळं अभिनेत्रीला कोसळलं रडू; म्हणाली, ‘हिंदू असल्यामुळं...’

‘हिंदुंसोबत अन्याय का होतोय?’ कंगना रणौतचं ट्विटर अकाउंट सस्पेड झाल्यामुळं बॉलिवूड अभिनेत्रीला कोसळलं रडू

‘हिंदुंसोबत अन्याय का होतोय?’ कंगना रणौतचं ट्विटर अकाउंट सस्पेड झाल्यामुळं बॉलिवूड अभिनेत्रीला कोसळलं रडू

‘हिंदुंसोबत अन्याय का होतोय?’ कंगना रणौतचं ट्विटर अकाउंट सस्पेड झाल्यामुळं बॉलिवूड अभिनेत्रीला कोसळलं रडू

मुंबई 6 मे: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हिचं ट्विटर अकाउंट बंद करण्यात आलं आहे. पश्चिम बंगालविषयी केलेल्या वादग्रस्त ट्विटमुळं हा निर्णय घेण्यात आला. परंतु ट्विटरच्या या निर्णयावर बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी (Payal Rohatgi) संतापली आहे. नरेंद्र मोदींचं सरकार असतानाही हिंदूंवर असा अन्याय का होतोय? कंगनाचं ट्विटर बंद करण्यामागचं खरं कारण काय? असा सवाल तिनं विचारला आहे. लक्षवेधी बाब म्हणजे ही प्रतिक्रिया देत असताना तिला अक्षरश: रडू कोसळलं होतं. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

पायलनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती म्हणाली, “गेल्या अनेक महिन्यांपासून मी त्रस्त आहे. मी अन्यायाविरोधात लढण्याचा प्रयत्न करतेय पण आता मी थकलेय. सरकार नेमकं काय करतेय तेच कळत नाही. मोदीजी पंतप्रधान आहेत. अमित शाह गृहमंत्री आहेत. तरी देखील हिंदूंचा बळी दिला जातोय. आम्ही एवढा पाठिंबा दिला तरी देखील ममता बॅनर्जी सत्तेत आल्या. कंगनाचं अकाउंट सस्पेंड करण्यात आलं. तिची काय चुकी. तिनं केवळ तुमचं समर्थन केलं होतं. मोदीजी तुम्ही हिंदूंना वाचवा.” अशा आशयाची प्रतिक्रिया तिनं या व्हिडीओद्वारे दिली. विशेष म्हणजे ही प्रतिक्रिया देत असताना ती ओक्साबोक्सी रडत होती. तिचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

‘संजय मिश्रांनी खुर्चीखाली सोडला उंदीर’; पाहा आसावरी जोशींचा अविस्मरणीय अनुभव

गेले काही दिवस कंगना सातत्याने ममता बॅनर्जींविरोधात ट्वीट करत होती. रोहिंग्या, CAA, NRC सगळ्याबद्दल तिनं कंमेट्स केल्या. बंगालची तुलना काश्मीरशीही करून झाली. शेवटी कोलकात्यामधील एका वकिलाने कंगनाविरोधात पोलीसात गुन्हा दाखल केली. “कंगना रणौत बंगालच्या लोकांना भडकवण्याचं काम करत आहे. तिच्या वक्तव्य आणि पोस्ट्समुळे कायदा-सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते”, अशी तक्रार या वकिलाने केली. त्यानंतर ट्विटरनेही तातडीने कारवाई करत तिचं अकाउंट सस्पेंड केलं. कंगनाची मॅनेजर म्हणून काम करणारी तिची बहीण रंगोली चंडेल हिचं अकाउंटही गेल्या महिन्यात ट्विटरने काढून टाकलं होतं. द्वेषमूलक मजकूर लिहिल्याने ट्विटरच्या धोरणांचं उल्लंघन झाल्याचं सांगत त्या वेळी ट्विटरने कारवाई केली होती.

First published:

Tags: Bollywood actress, Entertainment, Kangana ranaut, Twitter War