जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / पवनदीप-अरुणीताला झटका! कायदेशीर अडचणीत सापडलं हे Rumored Couple, वाचा नेमकं काय घडलं?

पवनदीप-अरुणीताला झटका! कायदेशीर अडचणीत सापडलं हे Rumored Couple, वाचा नेमकं काय घडलं?

पवनदीप-अरुणीताला झटका! कायदेशीर अडचणीत सापडलं हे Rumored Couple, वाचा नेमकं काय घडलं?

पवनदीप आणि अरुणिता कायदेशीर अडचणीत अडकल्याचं समोर आलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 मार्च-   ‘इंडियन आयडॉल 12’ चा  (Indian Idol 12)  विजेता पवनदीप राजन  (Pawandeep Rajan)  आणि फर्स्ट रनरअप ठरलेली अरुणिता कांजीलाल   (Arunita Kanjilal)  सतत सोशल मीडियावर चर्चेत असतात. या दोघांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडते. त्यांच्या येणाऱ्या प्रत्येक गाण्याला चाहते भरभरून प्रतिसाद देत आहेत. मात्र पवनदीप आणि अरुणिता कायदेशीर अडचणीत अडकल्याचं समोर आलं आहे. पाहूया काय आहे नेमकं प्रकरण. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, सोनीने ऑक्टोपस एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड  (M/s Octopus Entertainment Pvt Ltd) सोबत करार केला होता. ज्यामध्ये असे म्हटले होते की इंडियन आयडॉल 12 च्या विजेत्यांना त्यांच्यासोबत एक रोमँटिक अल्बम दिला जाईल. तसेच त्यांना त्याचं प्रमोशनसुद्धा करावं लागेल. पण आता पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल यांनी आपल्या दिलेल्या आश्वासनावरुन माघार घेतली आहे. समोर आलेल्या कायदेशीर नोटीसनुसार, इंडियन मोशन पिक्चर्स असोसिएशनला ऑक्टोपस एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडने संपर्क साधला होता. सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने करार केला असल्याची माहिती त्यांनी दिली होती. यामध्ये अरुणिता आणि पवनदीप यांची सर्व्हिसेस देण्याचे सांगण्यात आले होते. परंतु आता हे दोन्ही कलाकार एका गाण्याच्या शूटिंगसाठीही निर्मात्यांना सहकार्य करत नाहीयेत. मीडिया रिपोर्टनुसार, प्रथम अरुणिता आणि मग पवनदीपनेसुद्धा गाण्याचं शूटिंग, प्रमोशन आणि रिलीजमध्ये सहकार्य करणं बंद केलं आहे. सोनी वहिनीला कळवले असता त्यांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात