मुंबई 25 जुलै: बॉलिवूडचा चित्रपट निर्माता राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) हा कायम वादात सापडतो आणि वादही निर्माण करत असतो. आता दक्षिणेतला सुपरस्टार पवन कल्याणच्या (Pawan Kalyan) चित्रपटावरून वाद निर्माण झाला आहे. पवन कल्याणच्या आयुष्यावर वर्मा यांची चित्रपट तयार केला. त्यामुळे त्यांचे फॅन्स भडकले आहेत. या फॅन्सची जोरदार राडा केला असून राम गोपाल वर्मांच्या ऑफिसवर तुफान दगडफेक केलीय. पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे. या हल्ल्याची तक्रार राम गोपाल वर्मा यांनी ज्युबली हिल्स पोलिसांकडे केली आहे. त्यानंतर तपास करून पोलिसांनी 6 जणांना अटक केली. या वादावर वर्मा यांनी ट्विट करून माहितीही दिली आहे. या चित्रपटानंतर मला सातत्याने धमक्या येत आहेत. तसं धमक्यांची आणि त्या वातावरणात राहण्याची मला सवय आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. राम गोपाल वर्मा यांच्या ‘पावर स्टार’ या चित्रपटावरून हा वाद झाला आहे. या चित्रपटात चुकीच्या पद्धतीने पवन कल्याणचं आयुष्य दाखविल्याचा त्याच्या फॅन्सचा आरोप आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांचे फॅन्स चांगलेच भडकले आणि त्यांनी चक्क राम गोपाल वर्मांच्या ऑफिसवरच हल्ला केला. माझ्या ‘पावर स्टार’ची पॉवर या स्टारच्या पॉवर पेक्षा जास्त आहे असंही वर्मा यांनी म्हटलं आहे.
P k fans claiming to be janasena members attacked my office and they have been thrown out into the lockup by my guards and Cops ..I want to kiss and make love to them for giving me more publicity for POWER STAR 😘😘😘😍😍😍 pic.twitter.com/KQiiQ6WPes
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) July 23, 2020
इतर अभिनेत्यांप्रमाणेत पवन कल्याण यांनीही जनसेना या राजकीय पक्षाची स्थापना केली होती. लोकसभेच्या निवडणुकाही त्या पक्षाने लढवल्या होत्या. मात्र त्यात त्यांना फारसं यश मिळालं नव्हतं. दक्षिणेतले अनेक सुपरस्टार्स हे चिपटात यश मिळाल्यानंतर राजकारणात उडी घेतात. तमिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटकमध्ये याचं प्रमाण जास्त आहे.