मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /वडिलांच्या निधनानंतर 'हा' गायक घालू लागला आईचं मंगळसूत्र, स्वतःच सांगितलं कारण

वडिलांच्या निधनानंतर 'हा' गायक घालू लागला आईचं मंगळसूत्र, स्वतःच सांगितलं कारण

पलाश सेन

पलाश सेन

गायक पलाश सेन त्याच्या सुपरहिट गाण्यांसाठी ओळखला जातो. तो त्याच्या आईच्या खूप जवळ आहे आणि त्याने काही वर्षांपूर्वी तिचे मंगळसूत्र घालायला सुरुवात केली होती.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 28 जानेवारी :  गायक पलाश सेन त्याच्या सुपरहिट गाण्यांसाठी ओळखला जातो. तो त्याच्या आईच्या खूप जवळ आहे आणि त्याने काही वर्षांपूर्वी तिचे मंगळसूत्र घालायला सुरुवात केली होती. एका नवीन मुलाखतीत पलाशने सांगितलं की त्याची आईबरोबर सर्वाधिक भांडणं आणि मतभेद व्हायचे. त्याने आईचं नाव आपल्या आयुष्यातील 'नंबर वन पर्सन' असं ठेवलं आहे. तसंच त्याची आई मनाने खूप कणखर व्यक्ती असल्याचंही पलाशने सांगितलं. या संदर्भात ‘हिंदुस्थान टाइम्स’ने वृत्त दिलंय.

    पलाशने फाळणीनंतर आपल्या आईचा लाहोर ते जम्मू-काश्मीरपर्यंतचा प्रवास कसा झाला याबद्दल सांगितलं. तसेच एमबीबीएस शिकण्यासाठी 17 वर्षांची असताना तिने घर सोडल्याचंही त्याने उघड केलं. स्वतः डॉक्टर असलेल्या पलाशचा जन्म डॉक्टर पालकांच्या पोटी झाला होता.

    हेही वाचा - Rakhi sawant : राखी सावंतच्या आईचं दुःखद निधन; कॅन्सरशी झुंज ठरली अयशस्वी

    मॅशेबल इंडियाला दिलेल्या मुलाखतीत पलाशने आपल्या आईबद्दल सांगितलं. तो म्हणाला, "फाळणी झाली तेव्हा ती आठ वर्षांची होती. चार वर्षांच्या भावाची काळजी घेत आठ वर्षांची ती एकटीच लाहोर ते जम्मूपर्यंत चालत आली होती. ते दोघं सीमेपलीकडून जम्मूला एकटेच चालत आले. ती खूप खंबीर होती. ती अशा शाळेत गेली जिथे फक्त मुलं होती, कारण त्या वेळी जम्मू-काश्मीरमध्ये मुलींची शाळा नव्हती. ती 17 वर्षांची होती जेव्हा तिने लखनौमध्ये एमबीबीएस करण्यासाठी तिचं घर सोडलं होतं."

    तो पुढे म्हणाला, "जेव्हा तुम्ही इतके मजबूत असता तेव्हा तुमच्या जीवनातील काही गोष्टी थोड्या अधिक मजबूत होतात. तुम्ही एक कठोर व्यक्ती बनता. मला वाटतं की त्यामुळे आई आणि माझ्यामध्ये बरेच मतभेद आणि भांडणं झाली. ती माझ्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाची व्यक्ती आहे. तिच्याकडे एक मंगळसूत्र होतं, जे माझे वडील गेल्यावर तिने घालणं बंद केलं. मग मी ते मंगळसूत्र घालायला सुरुवात केली. मी ते घालतो. मी ते प्रामुख्याने स्टेजवर घालतो, त्या माध्यमातून तिचा आशीर्वाद माझ्यासोबत नेहमीच असतो. मी खरतौश देखील घालतो. ते मी इजिप्तमधून घेतलं होतं. त्यामध्ये, माझ्या पालकांची नावं इजिप्शियन चित्रलिपीत दोन्ही बाजूला लिहिलेली आहेत."

    पलाशने 1998 मध्ये दिल्लीमध्ये युफोरिया नावाच्या म्युझिक ग्रुपची स्थापना केली. हा बँड 'मेरी', 'धूम पिचक धूम', 'आना मेरी गली', 'अब ना जा', 'सोनेया', 'मेहफुज' आणि 'सोने दे मा' यासारख्या हिट गाण्यांसाठी ओळखला जातो. पलाशने 2001 मध्‍ये 'फिलहाल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटात तब्बू आणि सुष्मिता सेन यांच्याही भूमिका होत्या.

    First published:

    Tags: Bollywood, Entertainment, Singer