मुंबई, 27 नोव्हेंबर : गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन सृष्टीतून अनेक दुःखद बातम्या समोर येत आहे. कोणाचं ना कोणाचं निधन होत असल्याचं समोर येत आहे. अशातच आणखी एका गायकाचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. 'फेम' चित्रपटाची स्टार आणि 'फ्लॅशडान्स'चे शीर्षक गीत गायलेली ऑस्कर विजेती गायिका इरेन कारा यांचे निधन झाले आहे. वयाच्या 63 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याची बातमी समोर येताच जवळच्या व्यक्तींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री इरेन "फ्लॅशडान्स... व्हाट अ फीलिंग" गाण्यासाठी प्रसिद्ध आहे, ज्यासाठी त्यांना ऑस्कर आणि ग्रॅमी पुरस्कार मिळाला. इरेन कारा यांनी नंतर क्लिंट ईस्टवुड आणि टॅटम ओ'नील यांच्यासोबत चित्रपटांमध्ये काम केले. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, अभिनेत्रीच्या मॅनेजरने त्यांच्या मृत्यूची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, अभिनेत्रीचा फ्लोरिडा येथील तिच्या घरी मृत्यू झाला, मात्र यामागचे कारण सध्या समजू शकलेले नाही.
हेही वाचा - Vikram Gokhale Passes Away: असा नट पुन्हा होणे नाही! विक्रम गोखलेंच्या आठवणीत कलाकार भावुक
1959 मध्ये ब्रॉन्क्स, न्यूयॉर्क शहरात जन्मलेली, इरेन कारा या पाच मुलांपैकी सर्वात लहान होत्या आणि त्यांनी स्पॅनिश भाषेतील टेलिव्हिजनमध्ये कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांचे वडील पोर्तो रिकन आणि आई क्यूबन-अमेरिकन होती. बाल कलाकार म्हणून संगीत रेकॉर्ड केल्यानंतर, त्यांनी स्पॅनिश आणि इंग्रजी दोन्ही भाषेतील अनेक ब्रॉडवे संगीत नाटकं केली. 1980 मध्ये प्रसिद्ध झाल्यावर त्यांना कोको हर्नांडेझची भूमिका करण्याची संधी मिळाली आणि 'फेम' चित्रपटाचे शीर्षक गीत गाण्याची.
दरम्यान, इरेनच्या कुटुंबियांनी गोपनियतेची विनंती केली आहे. 1980 मध्ये रिलीज झालेल्या 'फेम'मध्ये इरेन कारा मुख्य पात्र कोको हर्नांडेझच्या भूमिकेत दिसल्या. न्यूयॉर्कच्या हायस्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या विद्यार्थ्यांची कथा या चित्रपटात सांगण्यात आली होती. तीन वर्षांनंतर, त्यांनी चित्रपटाच्या मूळ स्कोअरसाठी आणि सर्वोत्कृष्ट पॉप गायनासाठी दोन ग्रॅमी पुरस्कार जिंकले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Singer