Home /News /entertainment /

Oscars Award 2022: आतापर्यंत 'या' 5 भारतीयांनी उंचावलं आहे देशाचं नाव, ऑस्करवर नाव कोरणारे कोण आहेत हे दिग्गज कलाकार?

Oscars Award 2022: आतापर्यंत 'या' 5 भारतीयांनी उंचावलं आहे देशाचं नाव, ऑस्करवर नाव कोरणारे कोण आहेत हे दिग्गज कलाकार?

कोणताही भारतीय चित्रपट आतापर्यंत ऑस्कर जिंकू शकला नसला तरी नमित मल्होत्रा (Namit Malhotra Oscar Award 2022) यांच्याआधी पाच भारतीयांनी ऑस्कर मिळवला आहे. पाहूया कोण आहेत हे दिग्गज.

मुंबई, 28 मार्च: आज सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून मान्यता असलेला 94 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा (Oscar Award 2022) पार पडला. लॉस अँजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यंदा ‘रायटिंग विथ फायर’ या भारतीय माहितीपटाला ऑस्कर पुरस्कारात नामांकन मिळालं होतं. मात्र, पुरस्कार मिळू शकला नाही. DNEG चे संस्थापक आणि सीईओ नमित मल्होत्रा (Namit Malhotra Oscar Award) या भारतीयाला यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात 'Dune' या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट विज्युअल इफेक्ट्सचा पुरस्कार मिळाला आहे. ड्यून ही एक Si-Fi फिल्म आहे. DNEG चे संस्थापक आणि सीईओ नमित मल्होत्रा (Namit Malhotra Oscar Award) या भारतीयाला यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात 'Dune' या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट विज्युअल इफेक्ट्सचा पुरस्कार मिळाला आहे.
DNEG चे संस्थापक आणि सीईओ नमित मल्होत्रा (Namit Malhotra Oscar Award) या भारतीयाला यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात 'Dune' या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट विज्युअल इफेक्ट्सचा पुरस्कार मिळाला आहे.
दरम्यान गेल्या 94 वर्षांपासून आतापर्यंत एकही भारतीय चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळालेला नाही. कोणताही भारतीय चित्रपट ऑस्कर जिंकू शकला नसला तरी नमित यांच्याआधी पाच भारतीयांनी ऑस्कर मिळवला आहे. पाहूया कोण आहेत हे दिग्गज. 1. भानू अथैया भारतातील सर्वांत पहिला ऑस्कर पुरस्कार विजेती एक महिला होती. त्यांचं नाव भानू अथैया (Bhanu Athaiya Oscar Winner). त्यांना 'गांधी' चित्रपटासाठी 'सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइन’साठी ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. 1982 मध्ये आलेल्या गांधी चित्रपटातील कलाकारांचं कॉस्च्युम डिझाईन भानू अथैया यांनी केलं होतं. या चित्रपटाची निर्मिती ब्रिटिश दिग्दर्शक रिचर्ड अ‍ॅटनबरो यांनी केली होती. भानू अथैय्या यांनी 100 हून अधिक चित्रपटांसाठी कॉस्च्युम डिझाइन (costume design) केलं होतं. त्यांना ऑस्करशिवाय दोन राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले होते. दरम्यान, गांधी चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारासह इतर पाच ऑस्कर जिंकले होते. भानू अथैया
भानू अथैया
2. सत्यजित रे 1991 मध्ये देशातील ज्येष्ठ चित्रपट निर्माते सत्यजित रे (Satyajit Rey) यांना ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना 'ऑनररी लाइफटाइम अचिव्हमेंट'साठी ऑस्कर पुरस्कार मिळाला. मात्र, हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते ऑस्कर सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत. नंतर हा पुरस्कार त्यांना कोलकाता येथे पाठवण्यात आला. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. सत्यजित रे
सत्यजित रे
3. रेसुल पोक्कुट्टी रेसुल पोक्कुट्टीने (Resul Pokutty) 'स्लमडॉग मिलेनियर' चित्रपटासाठी ऑस्कर जिंकला होता. 'बेस्ट साउंड मिक्सिंग'साठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. या चित्रपटाला तीन ऑस्कर पुरस्कार मिळाले. या चित्रपटात देव पटेल, फ्रीडा पिंटो, इरफान खान, अनिल कपूर, महेश मांजरेकर आणि सौरभ शुक्लासारख्या कलाकारांची मांदियाळी होती. रेसुल पोक्कुट्टी
रेसुल पोक्कुट्टी
4. ए. आर. रेहमान ए. आर. रेहमान (A. R. Rehman) यांनी 2009 मध्ये ऑस्कर जिंकला होता. या दिग्गज भारतीय संगीतकाराला ‘स्लमडॉग मिलेनियर’ या चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वाधिक ऑस्कर पुरस्कार मिळवणारा भारतीय चित्रपट आहे. या चित्रपटातील ‘जय हो’ हे गाणं ए. आर. रेहमाननी गायलं होतं. ए. आर. रेहमान
ए. आर. रेहमान
5. गुलजार 2009 मध्येच भारतीय प्रसिद्ध कवी, चित्रपट दिग्दर्शक, संगीतकार आणि लेखक गुलजार (Gulzar) यांना ‘स्लमडॉग मिलेनियर’मधील ‘जय हो’ गाण्याच्या लिरिक्ससाठी ऑस्कर पुरस्कार देण्यात आला होता. हे गाणं ए. आर. रेहमान यांनी गायलं होतं. गुलजार
गुलजार
भारतीय सिनेमाला ऑस्कर मिळावा हे भारतीयांचं स्वप्न आतापर्यंत अधूरं राहिलं असलं तरीही या दिग्गजांनी भारताचं नाव निश्चितच उंचावलं आहे.
First published:

Tags: A. R. Rahman, Gulzar, Oscar, Oscar award, Oscar award show

पुढील बातम्या