Home /News /entertainment /

OSCAR 2022 मध्ये प्रेक्षक निवडणार आपला आवडता चित्रपट,कसं कराल मतदान?

OSCAR 2022 मध्ये प्रेक्षक निवडणार आपला आवडता चित्रपट,कसं कराल मतदान?

ऑस्कर पुरस्कार (Oscar Award 2022) सोहळ्यात या वर्षापासून एक नवीन सुरुवात केली जात आहे. सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटासाठी नवीन 'फॅन फेव्हरेट' (Fan Favorite Award) पुरस्कार दिला जाणार आहे.

    मुंबई, 15 फेब्रुवारी- ऑस्कर पुरस्कार (Oscar Award 2022)  सोहळ्यात या वर्षापासून एक नवीन सुरुवात केली जात आहे. सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटासाठी नवीन 'फॅन फेव्हरेट'  (Fan Favorite Award)  पुरस्कार दिला जाणार आहे. यामध्ये ट्विटर युजर्सनी दिलेल्या मतांच्या आधारे वर्षातील सर्वात लोकप्रिय चित्रपटाला हा पुरस्कार दिला जाणार आहे. ऑस्कर नामांकन 2022 नंतर, अनेक चित्रपट चाहत्यांना वाईट वाटत आहे की त्यांचे आवडते चित्रपट जसे की 'स्पायडर मॅन-नो वे होम' आणि 'नो टाइम टू डाय' हे चित्रपट ऑस्कर नामांकनाच्या यादीत आपलं स्थान निर्माण करू शकले नाहीत. कसं कराल आवडत्या चित्रपटासाठी मतदान- ऑस्कर आयोजकांनी यावर्षी चाहत्यांचा आवडता पुरस्कार यामध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटर युजर्स हॅशटॅग, #Oscars Fan Favourite किंवा Academy Awards च्या वेबसाइटला भेट देऊन 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या कोणत्याही चित्रपटासाठी चाहते नवीन श्रेणीमध्ये मतदान करू शकतात. असं म्हटलं जात आहे की या मास्टर स्ट्रोकद्वारे ते सर्व लोक जे अद्याप अकादमी पुरस्कारांशी संबंधित नव्हते किंवा त्यांच्या आवडत्या चित्रपटासाठी नामांकन न मिळाल्याने निराश झाले होते. असे चाहतेसुद्धा पुन्हा या पुरस्कार सोहळ्याशी जोडले जातील. निर्मात्यांनी सुरू केलेल्या या नवीन पुरस्कारामुळे अनेक चाहतेही खूप खूश आहेत. फॅन्स फेव्हरेट कॅटेगरीमध्ये कोणत्या चित्रपटाला पुरस्कार जिंकण्याची संधी मिळते, याचीही सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. यावेळी निर्णय परीक्षकांच्या नव्हे तर प्रेक्षकांच्या हातात असेल. ज्या चित्रपटाला सर्वाधिक मते मिळतील तो चित्रपट सर्वांच्या पसंतीस उतरेल. दरम्यान असंदेखील म्हटलं जात आहे, अशा परिस्थितीत प्रेक्षक त्या चित्रपटांना नॉमिनेट करतील, ज्यांना सध्या तरी यामध्ये स्थान मिळालेलं नाही. मात्र, काहीही असो, निर्मात्यांची ही सुरुवात खूपच रंजक असणार आहे. पूर्वी लाखो प्रेक्षक ऑस्कर टीव्हीवर पाहात असत. परंतु गेल्या काही वर्षांत टेलिकास्टिंगच्या वेळी टीआरपीमध्ये प्रचंड घट झाली आहे. जर आपण आकडेवारी पाहिली तर, गेल्या वर्षी 10 दशलक्षाहून अधिक लोकांनी टीव्हीवर ऑस्कर अवॉर्ड्स पाहिला जो एक वर्षापूर्वीच्या म्हणजेच 2020 च्या तुलनेत सुमारे 56 टक्क्यांनी कमी होतं.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Oscar award

    पुढील बातम्या