शपथ घेतल्यावर या दिग्गज नेत्याच्या पाया पडली नुसरत जहां

nusrat jahan लग्नानंतर आता नुसरत जहां ५ जुलैला रिसेप्शन देणार आहे. या पार्टीत अनेक बडे नेते आणि कलाकार मंडळी उपस्थित राहणार असल्याचं म्हटलं जात आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 25, 2019 04:30 PM IST

शपथ घेतल्यावर या दिग्गज नेत्याच्या पाया पडली नुसरत जहां

टीएमसीची सर्वात सुंदर खासदार नुसरत जहां गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. तुर्कीत डेस्टिनेशन वेडिंग केलं. लग्नानंतर भारतात परतल्यावर पहिल्यांदा नुसरत संसदेत गेली. लग्नानंतर पहिल्यांदा संसदेत जाताना नुसरतने पारंपरिक लुकला प्राधान्य दिलं. तिचा हा लुक पाहून संसदेत अनेकजण फक्त तिच्याकडेच पाहत होते. यावेळी नुसरतने कपाळात कुंकू भरलं होतं आणि लग्नातील हातावरची मेहंदी आणि लाल चूडा सर्वांचं लक्ष वेधून घेत होते. आज तिने संसदेत खासदार म्हणून शपथ घेतली. यानंतर तिने स्पीकर ओम बिडला यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले.

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या नुसरतने १७ व्या लोकसभा निवडणूक जिंकून पहिल्यांदा खासदार झाली. यावेळी नुसरतसोबत बंगाली अभिनेत्री मिमी चक्रवर्तीनेही मंगळवारी संसदेत जाऊन शपथ घेतली.

मिमी चक्रवर्तीने क्रीम रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता. तिनेही बंगाली भाषेत शपथ घेतली.

नुसरत जहांने व्यावसायिक निखिल जैनशी १९ जूनला तुर्कीतील बोडरम सिटीमध्ये लग्न केलं. लग्नामुळे नुसरत संसदेतील पहिल्या दिवसाच्या शपथविधी सत्रात उपस्थित राहू शकली नव्हती.

पहिल्यांदा मिमी आणि नुसरत लाइमलाइटमध्ये आल्या असं नाही. याआधीही दोघं आपल्या ग्लॅमरस अंदाजात संसदेत आल्या होत्या. दोघांचा पहिल्यांदा संसदेत आल्याचा ग्लॅमरस अंदाज सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

Loading...

लग्नानंतर आता नुसरत जहां ५ जुलैला रिसेप्शन देणार आहे. या पार्टीत अनेक बडे नेते आणि कलाकार मंडळी उपस्थित राहणार असल्याचं म्हटलं जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 25, 2019 04:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...