मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /जनहित में जारी... नुसरत भरुचा मेडिकल स्टोअर्समध्ये विकणार कंडोम

जनहित में जारी... नुसरत भरुचा मेडिकल स्टोअर्समध्ये विकणार कंडोम

यावेळी देखील ती अशाच एका थक्क करणाऱ्या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ती आपल्या आगामी चित्रपटात चक्क निरोधक अर्थात कंडोम (Condom) विकताना दिसणारा आहे.

यावेळी देखील ती अशाच एका थक्क करणाऱ्या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ती आपल्या आगामी चित्रपटात चक्क निरोधक अर्थात कंडोम (Condom) विकताना दिसणारा आहे.

यावेळी देखील ती अशाच एका थक्क करणाऱ्या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ती आपल्या आगामी चित्रपटात चक्क निरोधक अर्थात कंडोम (Condom) विकताना दिसणारा आहे.

मुंबई 23 मे: नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha) ही बॉलिवूडमधील एक अत्यंत प्रयोगशील अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. इतर अनेक अभिनेत्री जिथं हिरोंसोबत केवळ रोमान्स करण्यासाठी चित्रपटात काम करतात. त्या उलट नुसरत मात्र आपल्या भूमिकेत सतत काहीतरी वेगळेपण शोधत असते. यावेळी देखील ती अशाच एका थक्क करणाऱ्या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ती आपल्या आगामी चित्रपटात चक्क निरोधक अर्थात कंडोम (Condom) विकताना दिसणारा आहे.

नुसरतनं अलिकडेच आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाचं नाव ‘जनहित में जारी’ (Janhit Mein Jaari) असं आहे. या विनोदीपटात नुसरत एका कंडोम कंपनीच्या सेल्स एक्झिकेटिव्हची भूमिका साकारणार आहे. ती एका छोट्या शहरातून नोकरीच्या निमित्तानं मुंबईत येते. इथं तिला एका कंपनीच्या सेल्स एक्झिकेटिव्हची नोकरी मिळते. परंतु तिला दररोज कंडोम विकावे लागतात. जर मुंबईत राहायचं असेल. तर पैसे हवे अन् पैशांसाठी नोकरी टीकवायला हवी त्यामुळं ती हे काम करत राहते. मात्र हे काम करताना येणारे अडथळे अगदी विनोदी पद्धतीनं या चित्रपटात दाखवले जाणार आहे. शिवाय कंडोम म्हणजे काय? आणि त्याचं महत्व देखील अनोख्या पद्धतीनं या चित्रपटात दाखवलं जाणार आहे.

क्रिकेटपटूंसोबत लग्न करताच संपलं या अभिनेत्रींचं बॉलिवूड करिअर; कारण...

‘जनहित में जारी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक राज शांडिल्य आहेत. नुसरत आणि ते दुसऱ्यांदा एकत्र काम करणार आहेत. यापूर्वी ड्रीम गर्लमध्ये त्यांनी एकत्र काम केलं होतं. या चित्रपटाविषयी ते म्हणाले, जेव्हा ड्रीम गर्लचं चित्रीकरण करत होतो. तेव्हा मला हा विषय सुचला. खरं तर मी गंमत म्हणून ही स्टोरी नुशरतला सांगितली होती. परंतु तिला ती आवडली. अन् तिनं त्याचक्षणी जर हा चित्रपट तयार झाला तर यामध्ये मुख्य भूमिका करण्याची इच्छा व्यक्त केली. सध्या या चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरु आहे. पण लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल.

First published:

Tags: Bold photoshoot, Bollywood actress, Health