'No Photos' छोट्या तैमूरची फोटोग्राफर्सना ताकीद! सोशल मीडियावर VIDEO व्हायरल

'No Photos' छोट्या तैमूरची फोटोग्राफर्सना ताकीद! सोशल मीडियावर VIDEO व्हायरल

अनेकदा या फोटोग्राफर्सला फोटो न काढण्याचं त्याच्या स्टाईलमध्ये सांगतो. नुकताच त्याचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तो फोटोग्राफरवर चिडलेला असून फोटो काढू नका असं म्हणतोय.

  • Share this:

मुंबई, 18 डिसेंबर : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan)आणि अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) यांचा मुलगा तैमूर अली खान (Taimur Ali Khan) सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. फोटोग्राफर त्याचे फोटो काढण्यासाठी त्याचा सतत पाठलाग करत असतात. त्यामुळे तो अनेकदा या फोटोग्राफर्सला फोटो न काढण्याचं त्याच्या स्टाईलमध्ये सांगतो. नुकताच त्याचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तो फोटोग्राफरवर चिडलेला असून फोटो काढू नका असं म्हणतोय.

करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी ऑक्टोबर 2012 मध्ये लग्न केलं होतं. त्यानंतर डिसेंबर 2016 मध्ये तैमूरचा जन्म झाला. या व्हिडीओमध्ये तैमूर सोबत करीना कपूरही आहे. गाडीतून उतरल्यानंतर फोटोग्राफरला पाहून तो वैतागतो आणि 'नो फोटोज' असं ओरडतो. तो केवळ एव्ह्ड्यावरच थांबत नाही, तर आतमध्ये जाण्याआधी दरवाज्याजवळ तो फोटोग्राफरच्या दिशेने हवेत लाथही मारतो. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून आतापर्यंत 1 लाख लोकांनी पहिला आहे.

दरम्यान, सध्या करीना कपूर आपल्या What Women Want या कार्यक्रमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात दिया मिर्झा, कुणाल खेमू आणि कॅरी मिनाटी यांसारखे सेलिब्रिटी देखील आहेत. करीना कपूर लवकरच लाल सिंग चड्ढा (Lal singh chaddha) आणि तख्त (Takht) या दोन मोठ्या चित्रपटांमध्ये ती दिसणार आहे. तख्तमध्ये तिच्याबरोबर रणवीर सिंह, भूमी पेडणेकर, विकी कौशल, आलिया भट, अनिल कपूर आणि जान्हवी कपूर दिसणार आहे. तर या चित्रपटाचं दिग्दर्शन करण जोहर करणार आहे. लाल सिंह चड्ढा या चित्रपटामध्ये ती अमीर खानसोबत महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: December 18, 2020, 3:22 PM IST

ताज्या बातम्या