• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ‘मला पोटगी नको मुलगा हवा’; निशाने नाकारली करणची मागणी

‘मला पोटगी नको मुलगा हवा’; निशाने नाकारली करणची मागणी

निशानं करणकडून पोटगी नको असल्याचं म्हटलं. त्याबदल्यात तिला मुलाचा ताबा हवा आहे.

 • Share this:
  मुंबई 21 ऑगस्ट: अभिनेता करण मेहरावर (Karan Mehra) अभिनेत्री निशा रावल (Nisha Rawal) हिने कौटुंबीक हिंसाचाराचे आरोप केले होते. पत्नीने केलेल्या या आरोपांमुळे करणला अटक देखील करण्यात आली होती. शिवाय करणचे दुसऱ्या मुलीसोबत संबंध आहेत असा आरोप करत तिने घटस्फोटाची मागणी देखील केली. यानंतर आता पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आहे. कारण यावेळी निशानं करणकडून पोटगी नको असल्याचं म्हटलं. त्याबदल्यात तिला मुलाचा ताबा हवा आहे. OTT वर इतक्या कोटींना विकला गेला 'झुंड'; थिएटरमध्ये पाहायला मिळणार की नाही? निशाने लाखो रुपयांची पोटगी मागीतली होती. अन् ती देण्यास नकार दिल्यामुळे माझ्यावर तिने हिंसाचाराचे आरोप केले असा दावा करणनं केला होता. यावर प्रत्युत्तर देताना निशाने मला तुझे पैसे नको फक्त माझ्या मुलाचा ताबा दे अशी मागणी तिने केली. “माझ्या वकिलांनी करणला एक मेल पाठवला आहे. त्यात त्यांनी मला पोटगी नको असल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. मला फक्त माझ्या मुलाचा ताबा हवा आहे. कवीश माझ्यासोबत राहील. करण त्याला कधीही भेटायला येऊ शकतो. पण करणला ते मान्य नाही. करण यासाठी तयार होत नाहीए.” असा उलट दावा निशाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला.
  Published by:Mandar Gurav
  First published: