मुंबई,13 सप्टेंबर- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी करण मेहरा आणि निशा रावलमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून टोकाचा वाद सुरु आहे. या दोघांनी एकमेकांवर अतिशय गंभीर आरोप करत सर्वांनाच धक्का दिला होता. हा वाद अजूनही मिटलेला नाहीय. निशा रावलने पती करण मेहरावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. करणचे विवाहबाह्य संबंध असल्याचा दावाही तिने केला होता. मात्र, करणने तिचे सर्व आरोप फेटाळून लावत उलट निशावर विवाहबाह्य संबंधांचा आरोप केला होता. त्यानंतर आता निशाने पत्रकार परिषद घेत करणवर खळबळजनक आरोप केले आहेत.
निशा रावलने पत्रकार परिषद घेत पती करण मेहराने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आणि ती कुणालाच उत्तर देण्यासाठी बांधील नसल्याचं तिनं म्हटलं आहे. पत्रकार परिषदेत निशाने सांगितलं की, तिने नुकतंच करणला एक मेसेज पाठवला होता. आणि सोबतच त्याला सहानुभूती मिळवणं थांबवण्यास सांगितलं होतं. निशाने करणला म्हटलं, कृपया हे करणं थांबवा. हे नाटक असल्यासारखं दिसत आहे. या मुद्द्याची मीडिया ट्रायल होत आहे. हे प्रकरण सुसंस्कृत पद्धतीने सोडवायला हवं. मला असुरक्षित वाटत आहे. मला स्वतःची आणि माझ्या बाळाची काळजी वाटत आहे." असं निशाने म्हटलं आहे.
निशा रावलने पुढे म्हटलं, “उद्या जर आपल्या मुलाने हा व्हिडिओ पाहिला किंवा मी घरातून बाहेर पडले आणि माझ्या मुलासमोर कुणी याबबाबत काही बोलले तर काय होईल. आणि मी विक्टिम कार्ड खेळत नाहीय. करण मात्र खरच विक्टिम कार्ड खेळत आहे. मला चांगल्या वातावरणात माझ्या मुलाचं संगोपन करायचं आहे. आणि जर करण मेहरा यामध्ये आपलं योगदान देऊ शकत नसेल तर कृपया त्याने माघार घ्यावी. आणि मला माझं आयुष्य जगू द्यावं'. असं म्हणत निशाने करणवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
(हे वाचा:Arti Singh: गोविंदाच्या भाचीचं थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन; 18 दिवसात घटवलं 5 kg वजन )
निशा रावलने यावेळी अनेक मुद्द्यांवर आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. करणच्या समर्थनार्थ साक्ष देणाऱ्यांबद्दलही निशा रावलने आपलं मत मांडलं आहे. करणच्या साक्षीदारांबाबत बोलताना निशा म्हणाली, “मला या लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. मला वाटतं की, त्यांनी त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. हे लोक सर्व घटना नाटकीय पद्धतीने मांडत आहेत. मी जे काही करत आहे ते माझ्या मुलासाठी करत आहे. जर करणला काही करायचं असेल तर त्यासाठी एक योग्य कायदेशीर प्रक्रिया आहे." अशाप्रकारे पत्रकार परिषद घेत निशा रावलने पुन्हा पती करण मेहरावर विक्टिम कार्ड खेळत असल्याचे आरोप केले आहेत. आता यावर करण काय उत्तर देतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Tv actors