‘स्वत:ची लायकी विसरु नकोस’; अभिनेत्री निक्की तांबोळीला मिळतायेत धमक्या
‘स्वत:ची लायकी विसरु नकोस’; अभिनेत्री निक्की तांबोळीला मिळतायेत धमक्या
निक्कीनं आपल्या नेहमीच्याच अंदाजात अली गोनी (Aly Goni) आणि जॅस्मिन भसिनवर (Jasmin Bhasin) निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी तिचा हा प्रयत्न पुर्णपणे फसला आहे.
मुंबई 18 मार्च: अभिनेत्री निक्की तांबोळी (Nikki Tamboli) ही आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. बिग बॉसमध्ये झळकलेल्या या अभिनेत्रीनं शोमधून बाहेर पडताच निर्मात्यांसह अनेकांवर टीका केली होती. आता पुन्हा एकदा निक्कीनं आपल्या नेहमीच्याच अंदाजात अली गोनी (Aly Goni) आणि जॅस्मिन भसिनवर (Jasmin Bhasin) निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी तिचा हा प्रयत्न पुर्णपणे फसला आहे. या कलाकारांच्या चाहत्यांनीच तू आपल्या लायकीत राहा अशा आशयाच्या प्रतिक्रिया देत निक्कीला ट्रोल केलं आहे.
नेमकं हे प्रकरण आहे तरी काय?
निक्कीनं अलिकडेच व्हिजे अँडी कुमार याला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिला अली गोनीबाबत प्रश्न विचारला गेला. तुला या अभिनेत्यासोबत डेटवर जायला आवडेल का? असा प्रश्न अँडीनं विचारला. अर्थात क्षणाचाही विलंब न करता तिनं हो असं उत्तर दिलं. मला तो आजही आवडतो असं स्पष्टीकरण तिनं दिलं. परंतु यानंतर तिनं अलीची पत्नी जॅस्मिनवर जोरदार टीका केली. तिला कोणीही विचारत नाही तिच्याकडे कुठल्याही प्रकारचा फॅनबेस नाही. असं ती म्हणाली. अर्थात तिच्या या वक्तव्यामुळं जॅस्मिनचे चाहते संतापले अन् त्यांनी निक्कीला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
MEGA TREND FOR NIKKI TAMBOLI IS IN THE LIST..!!!
THIS TREND IS GOING TO BREAK ALL THE PREVIOUS TREND RECORDS OF @nikkitamboli
NIKKI TAMBOLI AUKAT ME REH
JASMIN SIRF ALY KA HAI.. pic.twitter.com/imFdxE93uR
— ALY GONI FAN FOREVER.. (@Sunnydperfect) March 18, 2021
Nikki...Dear! You aren't celebrity enough to have my attention.
But I am supporting my friends.
NIKKI TAMBOLI AUKAT ME REH
— TiO (@madd_richard) March 18, 2021
“तुझी लायकी आहे का? जॅस्मिनबद्दल बोलायची. प्रसिद्धीसाठी तू आणखी किती खालच्या स्थरावर जाणार?” अशा आशयाच्या प्रतिक्रिया देत जॅस्मिनच्या चाहत्यांनी तिच्यावर जोरदार टीका केली. अर्थात टीका पाहून निक्की देखील शांत बसली नाही. “तुम्हाला किती पैसे मिळतात जॅस्मिनच्या बाजून ट्विट करण्यासाठी?” असा सवाल करुन तिनं ट्रोलर्सला आणखी डिवचंलं. सध्या हा वाद सोशल मीडियावर चर्चेत आहे.
Published by:Mandar Gurav
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.