S M L

व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी 'बबन'ची जोडी म्हणतेय 'जगण्याला पंख फुटले'!

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त 'ख्वाडा' फेम दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केलाय. ग्रामीण पार्श्वभूमीवर फुलणारं हे प्रेम सिनेमात पहायला मिळणारेय.

Sonali Deshpande | Updated On: Feb 14, 2018 02:18 PM IST

व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी 'बबन'ची जोडी म्हणतेय 'जगण्याला पंख फुटले'!

14 फेब्रुवारी : 'प्रेम' म्हणजे एकमेकांसाठी झुरणं, दोघांना एकमेकांबद्दल वाटणारी अनाहूत ओढ म्हणजे प्रेम...! अशा या प्रेमाच्या बेधुंद लहरीत रंगणाऱ्या व्हेलेंटाईन डे निमित्ताने, आगामी बबन सिनेमातील  'जगण्याला पंख फुटले' हे प्रेमगीत खास प्रेमीजनांसाठी लाँच करण्यात आले. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त 'ख्वाडा' फेम दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केलाय. ग्रामीण पार्श्वभूमीवर फुलणारं हे प्रेम सिनेमात पहायला मिळणारेय.

नुकतेच या सिनेमाचे दादर येथील प्लाझा सिनेमागृहात मोठ्या दिमाखात पोस्टर आणि गाण्याचे लाँच करण्यात आले. ग्रामीण भागातील प्रेमकहाणी दाखवणारा हा सिनेमा येत्या २३ मार्च रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असल्याची घोषणादेखील याच दरम्यान करण्यात आली. सिनेमाच्या संपूर्ण स्टारकास्टच्या उपस्थितीत प्रदर्शित झालेल्या या सिनेमातील हे गाणे,  प्रेमाच्या गुलाबी रंगाची उधळण करते. प्रेमाची परिभाषा मांडणाऱ्या या गाण्याचे लेखन प्रोफेसर डॉक्टर विनायक पवार यांनी केलंय तर , संगीत दिग्दर्शक हर्षित अभिराजचं संगीत असलेल्या या गाण्याला अन्वेशा दत्ता गुप्ता आणि ओंकारस्वरूप या जोडगोळीने आवाज दिला आहे.'बबन' हा सिनेमा एका ग्रामीण युवकावर आधारित जरी असला तरी, आजच्या तरुण पिढीचे भावविश्व आणि त्यांची महत्त्वाकांक्षा यात पाहायला मिळणार आहे. 'ख्वाडा' अभिनेता भाऊसाहेब शिंदेची यात प्रमुख भूमिका असून, त्याच्यासोबत गायत्री जाधव ही नवोदित अभिनेत्री 'बबन' मध्ये झळकणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 14, 2018 02:18 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close