05 जुलै : अभिनेता सूरज पंचोली अनेक दिवस मोठ्या पडद्यावरून गायब आहे. पण 2018 त्याच्यासाठी थोडं लकी ठरणार आहे असं म्हणावं लागेल. कारण त्याचे दोन सिनेमे 2018ला बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहेत. सूरजने हाफिज आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर प्रभुदेवाचे सिनेमे साइन केले असून तो या सिनेमांच्या तयारीला लागलाय. प्रभुदेवाच्या सिनेमाच्या शूटिंगला सूरज सप्टेंबरमध्ये सूरुवात करणार आहे. तर या सिनेमा आधी तो हाफिजच्या सिनेमाचं शूटिंग पूर्ण करेल. सूरज या सिनेमासाठी फार मेहनत घेतानाही दिसतोय. आता 2018चं वर्ष सूरजसाठी लकी ठरेल का हे सिनेमे रिलीज झाल्यानंतरच कळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.