
मिस इंडिया वर्ल्ड 2022 चा ग्रँड फिनाले 3 जुलै रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. रात्री उशिरा या कार्यक्रमात विजेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली.

जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे झालेल्या समारंभात राजस्थानमधील रुबल शेखावत फेमिना मिस इंडिया-2022 ची 'फर्स्ट रनर अप' ठरली आणि उत्तर प्रदेशच्या शिनाता चौहानला 'सेकंड रनर अप' म्हणून गौरविण्यात आले.

मिस इंडिया वर्ल्ड 2022 चा किताब जिंकणारी सिनी शेट्टी फक्त 21 वर्षांची आहे. ती सध्या चार्टर्ड फायनान्स अॅनालिस्टचा कोर्स करत आहे.

मिस इंडिया वर्ल्ड 2022 किताब जिंकलेल्या सिनी शेट्टीवर सध्या कौतुकांचा वर्षाव होत आहे. ती कर्नाटकची असली, तरी जन्माने मुंबईकर आहे.

नेहमीप्रमाणे यंदाही मिस इंडिया वर्ल्डची स्पर्धा प्रेक्षणीय होती. यावेळी या स्पर्धेत 31 सौंदर्यवतींमध्ये चुरशीची स्पर्धा झाली.




