'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत अनाजी पंतांच्या कारवाया जोरदार सुरू आहेत. अनाजी पंतांना शंभूराजांविरोधात बंड पुकारायचंय.
अचानक याचा सुगावा लागतो. संभाजी महाराजांकडे एक अत्तर विकणारा येतो. सुरुवातीला महाराज अत्तर नको म्हणतात.
संभाजी महाराजांवर कट कारस्थान करणाऱ्यांच्या पत्रावर कस्तुरी अत्तराचाच सुगंध असतो. त्यामुळे महाराज हे अत्तर कोणाला विकलेस त्याचं वर्णन कर, असं अत्तरवाल्याला सांगतात.
आता लवकरच अनाजी पंतांचा कट उघड होणार. अकबर आणि अत्तरवाला या दोघांकडून मिळालेल्या माहितीवरून बिंग फुटणार आणि अनाजी पंतांना हत्तीच्या पायाखाली दिलं जाणार.