मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /हिंदी मालिकांमध्ये चिन्मय मांडलेकरची 'दस्तक'

हिंदी मालिकांमध्ये चिन्मय मांडलेकरची 'दस्तक'

क्राईम पेट्रोल सतर्क ही सीरियल आता बदलून क्राईम पेट्रोल दस्तक झालीय. आणि या नव्या रूपातल्या मालिकेत चिन्मय मांडलेकर पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका करतोय.

क्राईम पेट्रोल सतर्क ही सीरियल आता बदलून क्राईम पेट्रोल दस्तक झालीय. आणि या नव्या रूपातल्या मालिकेत चिन्मय मांडलेकर पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका करतोय.

क्राईम पेट्रोल सतर्क ही सीरियल आता बदलून क्राईम पेट्रोल दस्तक झालीय. आणि या नव्या रूपातल्या मालिकेत चिन्मय मांडलेकर पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका करतोय.

    मुंबई, 29 आॅगस्ट : मुंबईतला एक गर्दीचा भाग. तिथे अभिनेता चिन्मय मांडलेकर अक्षरश: पळतोय. कोणाच्या तरी मागावर आहे. पण आजूबाजूच्या गर्दीला काहीच कळत नाहीय. ती नेहमीप्रमाणेच पुढे सरकतेय. पण चिन्मयच्या मागे आहे कॅमेरा. हो, हे सुरू आहे शूटिंग. पण ते कुठल्या सिनेमाचं नाही. तर ते आहे एका सीरियलचं.

    क्राईम पेट्रोल सतर्क ही सीरियल आता बदलून क्राईम पेट्रोल दस्तक झालीय. आणि या नव्या रूपातल्या मालिकेत चिन्मय मांडलेकर पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका करतोय. पूर्वी याचं सूत्रसंचालन अनुप सोनी करायचा. आता याचं स्वरूपच बदललंय. यात पोलीस इन्स्पेक्टरच आपली गोष्ट सांगतो. 'आता या क्राईम पेट्रोलचं पूर्ण स्वरूपच बदललंय.' चिन्मय मांडलेकरनं आमच्याशी याबद्दल बातचीत केली.

    ' कॅनडिड शूट असतं. पब्लिक प्लेसमध्ये शूट होतं. एकदम नॅचरल. कोणाला शूट सुरू आहे हे कळतंच नाही,' चिन्मय सांगतो. ' यात प्रत्येक इन्स्पेक्टर त्याची गोष्ट सांगतो. म्हणजे फक्त एखादी केसच नाही, तर पोलिसांच्या शारीरिक, कौटुंबिक समस्या यात असतात. बरं, प्रत्येक पोलीस इन्स्पेक्टर त्याच्या त्याच्या वृत्तीनुसार त्या केसकडे पाहतो. हेही अधोरेखित झालंय.'

    चिन्मयला हे शूट थकवणारं असलं तरी करताना मजा येते. तो सांगतो, ' हे शूट करताना मी मुंबईच्या अनेक अनोळखी जागा पाहिल्या. ज्या मला माहीतच नव्हत्या. गेली 40 वर्ष मी मुंबईत राहतोय. मुंबई पालथी घातलीय. पण क्राईम पेट्रोलच्या शूटसाठीच्या जागा पूर्णच वेगळ्या असतात.'

    चिन्मयनं आतापर्यंत 3 स्टोरीज शूट केल्यात. अभिनेता मंगेश कदमनंही यात भूमिका केलीय. चिन्मय म्हणतो मराठी मालिकांपेक्षा हिंदी मालिकांची बजेट्स खूप मोठी असतात. अगदी 5 ते 7 पट. चिन्मयनं हिंदी सिनेमात काम केलंय, पण हिंदी टेलिव्हिजनवरचा हा पहिलाच अनुभव. चार वर्ष तुकोबा साकारल्यावर एकदम दुसऱ्या टोकाची भूमिका करताना चिन्मय ती एंजाॅयही करतोय.

    नववधूच्या वेशात कतरिना दिसली सलमानच्या आईसोबत, काय आहे मामला?

    First published:

    Tags: Serial