जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'मोबाईलमुळे जग जवळ आलंय पण...'; छोट्या परीने दिला लाखमोलाचा संदेश

'मोबाईलमुळे जग जवळ आलंय पण...'; छोट्या परीने दिला लाखमोलाचा संदेश

'मोबाईलमुळे जग जवळ आलंय पण...'; छोट्या परीने दिला लाखमोलाचा संदेश

बालकलाकार मायरा वैकुळ तर सगळ्यांची आवडती बनली आहे. मायरानं अगदी कमी कालावधीत तिच्या अभिनयानं आणि निरागसतेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 24 सप्टेंबर : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे.  या मालिकेतील सगळ्याच कलाकारांना भरभरुन प्रेम मिळत असतं. या मालिकेतील छोटीशी परी म्हणजेच बालकलाकार मायरा वैकुळ तर सगळ्यांची आवडती बनली आहे. मायरानं अगदी कमी कालावधीत तिच्या अभिनयानं आणि निरागसतेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. चिमुकली मायरा सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. अशातच मायरा एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे. मायराने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ तिनं केलेल्या एका जाहिरातीचा आहे. या जाहिरातीमधून मायरा लाखमोलाचा संदेश देताना दिसत आहे. मोबाईलमुळे जग जवळ आलंय पण जवळची नाती दूर होतायेत हे दाखवण्यात आलंय. तिने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

जाहिरात

‘मायराच्या या पोस्टवर भरभरुन कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव होतोय. खूप छान संदेश, खूप छान केलंस, खूप काही शिकवलं आम्हाला, खरा आणि छान मेसेज’, अशा अनेक प्रकारच्या कमेंट येत आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, मायराचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामुळे ती नेहमीच चर्चेचा केंद्रबिंदू असते. ती वेगेवेगळ्या थीमवर फोटो, व्हिडीओ बनवते. तिच्या आईवडिलांसोबतही ती ट्विनिंग कपडे घालून फोटोशूट करते. मायराच्या हस्यानं ती चाहत्यांना तिच्या प्रेमात पाडते त्यामुळे अगदी लहानग्या वयात तीनं मोठं नाव कमावलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात