मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Sushant singh Rajput आत्महत्या प्रकरण, पोलीस नोंदवणार अभिनेत्री संजना सांघवीचा जबाब

Sushant singh Rajput आत्महत्या प्रकरण, पोलीस नोंदवणार अभिनेत्री संजना सांघवीचा जबाब

सुशांतच्या शेवटच्या चित्रपटात ती सोबत असल्याने त्याची मानसिक स्थिती काय होती याची आणि इतर गोष्टींची माहिती पोलिसांना मिळू शकते.

सुशांतच्या शेवटच्या चित्रपटात ती सोबत असल्याने त्याची मानसिक स्थिती काय होती याची आणि इतर गोष्टींची माहिती पोलिसांना मिळू शकते.

सुशांतच्या शेवटच्या चित्रपटात ती सोबत असल्याने त्याची मानसिक स्थिती काय होती याची आणि इतर गोष्टींची माहिती पोलिसांना मिळू शकते.

  मुंबई 27 जून: अभिनेता सुशांत सिंह राजपूर (Sushant singh Rajput ) आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलीस कसून चौकशी करत आहेत. आता या प्रकरणात अभिनेत्री संजना सांघवीचा जबाब मुंबई पोलीस नोंदविणार आहेत. सोमवारी तिचा जबाब नोंदवून घेतला जाणार आहे. या आधी पोलिसांनी अनेकांची चौकशी केली असून सुशांत बद्दल बऱ्याच गोष्टी पोलिसांना कळाल्या आहेत. संजना ही सुशांतचा शेवटचा चित्रपट असलेल्या दिल बेचारा मध्ये त्याच्या सोबत होती. आता ओटीपी प्लॅटफॉर्मवर 24 जुलैला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

  सुशांतच्या शेवटच्या चित्रपटात ती सोबत असल्याने त्याची मानसिक स्थिती काय होती याची आणि इतर गोष्टींची माहिती पोलिसांना मिळू शकते. पण या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान त्या दोघांचे संबंध फारसे चांगले नव्हते. सुशांतने जास्तच जवळीक दाखवत चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप संजनाने केला होता. Me too कँपेन दरम्यान हे प्रकरण चांगलेच गाजले होते.

  सुशांतला जाऊन आज 13 दिवस झाले तरी या दु:खातून त्याचा मित्रपरिवार, सहकलाकार, चाहते सावरले नाही आहेत. सुशांतच्या कुटुंबीयांचे, त्याच्या वडिलांचे दु:ख तर अनाकलनिय आहे. दरम्यान या सगळ्या घटनांमध्ये सुशांतच्या कुटुंबीयांनी मोठ्या धैर्याने एक निर्णय घेतला आहे.

  पहिल्यांदा असफल झाल्यावर दुसऱ्या प्रयत्नात सुशांतने घेतला गळफास, पोलिसांना संशय

  सुशांतच्या कुटुंबीयांनी असा निर्णय घेतला आहे की सुशांतचे पटना याठिकाणी असणारे घर सुशांतचे मेमोरिअल बनवण्यात येणार आहे. याच घरामध्ये सुशांतने त्याचे बालपण घालवले आहे. सुशांतच्या जाण्याने त्याचा चाहतेवर्ग दु:खी आहे. आपला आवडता कलाकार आपल्यात नाही, हे दु:खच त्यांना सहन होत नाही आहे. अशावेळी ही मेमोरिअल सुशांतच्या चाहतेवर्गासाठी देखील खुले केले जाणार आहे. याठिकाणी सुशांतच्या काही वस्तू, त्याची पुस्तकं, त्याचा  टेलिस्कोप ठेवण्यात येणार आहे. सुशांतच्या परिवाराने निवेदन जारी करून यासंदर्भात माहिती दिली आहे.

  काय आहे सुशांत आणि सिया कक्कर आत्महत्येचं कनेक्शन? कुटुंबीयांची धक्कादायक माहिती

  सुशांतलादेखील एका फेअरनेस क्रिमच्या जाहिरातीची मोठी ऑफर आली होती. ही जाहिरात करण्यासाठी त्याला एक-दोन नव्हे तर तब्बल 15 कोटी रुपये मिळणार होते. मात्र फेअरनेस क्रिमची जाहिरात करणं त्यांना पटलं नाही. त्यामुळे त्याने कोट्यवधी रुपयांची ही जाहिरात धुडकावली.

  अभिनेत्री कंगना रणौत, अनुष्का शर्मा, प्रियंका चोप्रा, स्वरा भास्कर, कल्कि केकला याशिवाय रणबीर कपूर, अभय देओल, रणदीप हुड्डा यांसारख्या कलाकारांनीही फेअरनेस क्रिमची जाहिरात करणं नाकारलं.

   

  First published:
  top videos