मुंबई, 10 जून: अनेक सुपरस्टार अभिनेत्यांची मुलं बॉलिवूडमध्ये स्वतःच्या अभिनयाची जादू दाखवू शकली नाहीत. त्यांचे आई किंवा वडील किंवा दोघंही खूप मोठे स्टार होते; पण मुलांचे चित्रपट मात्र फ्लॉप झाले. या यादीतलं एक नाव म्हणजे मिथुन चक्रवर्ती आणि त्यांचा मुलगा मिमोह चक्रवर्ती होय. ‘जिमी’ हा पहिला चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर आपल्या आई-वडिलांची प्रतिक्रिया काय होती याबद्दल मिमोहने अलीकडेच माहिती दिली. या संदर्भातलं वृत्त ‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलं आहे. मिमोह हा मिथुन चक्रवर्ती आणि योगिता बाली यांचा मोठा मुलगा आहे. त्याला दिशानी चक्रवर्ती नावाची एक दत्तक बहीण आणि नमाशी हा एक धाकटा भाऊ आहे. नकाशीने ‘बॅड बॉय’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय. मिमोहचा पहिला चित्रपट फ्लॉप झाल्याने त्याचे वडील मिथुन व आई योगिता बाली हे दोघं खूप रडले होते. मिमोह ज्युनिअर आर्टिस्ट होण्याच्याही लायकीचा नाही, अशी टिप्पणी ‘जिमी’ चित्रपटाच्या एका रिव्ह्यूमध्ये करण्यात आली होती. त्याच्या अपयशानंतर त्याची आई योगिता बाली यांची एका कॉमेडी शोमध्ये खिल्ली उडवल्याने मिमोह चिडला होता, असंही त्याने सांगितलं.
क्रिटिक्सनी मिमोहच्या अभिनयावर व ‘जिमी’ चित्रपटावर टीका केली होती. त्याची आठवण सांगताना मिमोह ‘सिद्धार्थ कन्नन’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “मी, आई आणि बाबा आम्ही सगळे त्या वेळी रडलो होतो. आम्ही हताश झालो होतो. आता मी याबद्दल सहज बोलत आहे; पण तेव्हा ते खूप दुखावले होते. मला आठवतं, की मिमोह चक्रवर्ती ज्युनियर कलाकार होण्याच्याही लायकीचा नाही, असा जिमी सिनेमाचा रिव्ह्यू वाचल्यावर मी खूप निराश झालो होतो.” Parineeti- Raghav: सिड कियाराच्या वाटेवर परिणीती चोप्रा; ‘या’ आलिशान पॅलेसमध्ये बांधणार लग्नगाठ; पाहा Inside फोटो “एका कॉमेडी शोमध्ये कोणी तरी म्हटलं, की मिमोहचा चित्रपट पाहिल्यानंतर असं वाटतं की ‘योगिता बालीमध्येच कदाचित तेवढी क्षमता नव्हती.’ मी म्हणालो, ‘माझ्या आईबद्दल बोलू नका. माझे वडील इंडस्ट्रीतले लीजंड आहेत; पण माझ्या आईने तुमचं काय बिघडवलं आहे?’ कोणाच्याही आईबद्दल बोलू नये, इतकंही एखाद्याला कळू नये का. एक वेळ माझ्या वडिलांबद्दल बोला. माझी खिल्ली उडवा; पण माझ्या आईबद्दल का?,” असं मिमोह पुढे म्हणाला. मिमोहने हाँटेड थ्रीडी, लूट, रॉकी, दुश्मन, मैं मुलायमसिंह यादव आणि रोष या चित्रपटांमध्ये काम केलंय. हे सगळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि नेहा शर्माच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘जोगिरा सारा रा रा’मध्ये तो अलीकडेच झळकला होता. कुशान नंदी दिग्दर्शित या चित्रपटाला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला; पण तो बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही.