बॉलिवूड अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा आज 71 वा वाढदिवस आहे. मिथुनदा राज्यसभेचे सदस्यही आहेत.
आता खासदार असलेल्या या लाडक्या अभिनेत्याचा जन्म 1950 साली कोलकात्यामध्ये झाला.
डिस्को डान्सरच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या मिथुन चक्रवर्तीला लोक प्रेमाने दादा म्हणतात. डिस्को डान्सर सिनेमाच्या यशानंतर मिथुन चक्रवर्ती पॉप्युलर झाले. पण सध्या त्यांच्याकडे कोणतेही मोठे सिनेमे नाहीत पण तरीही हा स्टार 240 कोटी रुपये कमतो.
सुपरहिट सिनेमांसोहबl मिथुनदा यांची लव्ह लाईफही नेहमी चर्चेत राहिली.
मिथुनला लहानपणापासूनच डान्सची आवड होती. लहानसहान गल्ल्यांध्ये डान्स करून ते पैसे कमवत होते.
फक्त डान्स नाही तर मिथुन यांना अभिनयाची मोठी आवड होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या आवडीचं सोनं करत सगळ्यांचीच मनं जिंकली.
1993 ते 1998 हा कालावधी मिथुनदा यांच्यासाठी सर्वात कठीण काळ होता. याकाळात त्यांचे एकूण 33 सिनेमे फ्लॉप गेले.
पण त्यांच्या चाहत्यांनी त्यांचा हात कधीच सोडला नाही. मिथुनदा आज मोनार्क ग्रुपचे मालक आहेत.
त्यांचा लक्झरी हॉटेलचा व्यवसाय आहे.
ऊटी आणि मसूरीसारख्या बऱ्याच ठिकाणी त्याची हॉटेल्स आहेत.
सौजन्य- News18
मिथुन चक्रवर्ती यांचं स्वत:चं प्रोडक्शन हाउसदेखील आहे.
आणि याचमुळे ते सिनेमा न करतादेखील वर्षाला 240 करोड कमवतात. पण एक काळ असा होता जेव्हा त्यांना 2 वेळच्या जेवणाचीसुद्धा काळजी असायची.