दोघांचेही फोटो अतिशय लक्षवेधी आहेत. सिद्धार्थनं शेअर केलेल्या फोटोमध्ये मिताली आणि तो अतिशय सुंदर खळाळून हसतो आहे. सोबतच एका फोटोत सिद्धार्थची आईसुद्धा त्याच्यासोबत दिसते आहे.View this post on Instagram
सिद्धार्थ आणि मितालीचे फोटो सगळ्याच सोशल मीडियाचं लक्ष वेधून घेत आहेत. या फोटोंना काहीच तासात 50 ते 60हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी दोघांना शुभेच्छा देणाऱ्या कमेंट्स या फोटोवर दिल्या आहेत. मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर हे मराठी इंडस्ट्रीमधील एक कूल कपल आहे. हे दोघे लग्नबंधनात कधी अडकतात याकडं सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं.View this post on Instagram
दोन वर्षांपूर्वी व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधत सिद्धार्थनं थेट इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर लगोलग त्याच वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात त्यानं मितालीला प्रपोज केलं होतं.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Instagram, Marriage, Siddharth chandekar