मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Saisha Shinde's Story: मिस युनिव्हर्स हरनाज संधूचा ड्रेस डिझाईन करणारी सायशा शिंदे आहे ट्रान्सजेंडर

Saisha Shinde's Story: मिस युनिव्हर्स हरनाज संधूचा ड्रेस डिझाईन करणारी सायशा शिंदे आहे ट्रान्सजेंडर

अंतिम फेरीत हरनाज संधू जेव्हा स्टेजवर पोहोचली, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या लोकांसह मीडियाच्या नजरा तिच्या खास बिंज-सिल्व्हर गाऊनवर ( special binge-silver gown ) खिळल्या होत्या. या ड्रेसमध्ये हरनाज एखाद्या अप्सरेपेक्षा कमी दिसत नव्हती.

अंतिम फेरीत हरनाज संधू जेव्हा स्टेजवर पोहोचली, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या लोकांसह मीडियाच्या नजरा तिच्या खास बिंज-सिल्व्हर गाऊनवर ( special binge-silver gown ) खिळल्या होत्या. या ड्रेसमध्ये हरनाज एखाद्या अप्सरेपेक्षा कमी दिसत नव्हती.

अंतिम फेरीत हरनाज संधू जेव्हा स्टेजवर पोहोचली, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या लोकांसह मीडियाच्या नजरा तिच्या खास बिंज-सिल्व्हर गाऊनवर ( special binge-silver gown ) खिळल्या होत्या. या ड्रेसमध्ये हरनाज एखाद्या अप्सरेपेक्षा कमी दिसत नव्हती.

पुढे वाचा ...

    मुंबई, 15 डिसेंबर-    इस्रायल   ( Israel )   येथे 70 वी मिस युनिव्हर्स 2021   ( Miss Universe 2021 )   स्पर्धा नुकतीच पार पडली. ही स्पर्धा यंदा भारताने जिंकली. चंदीगडच्या हरनाज संधू    (Harnaaz Sandhu)   हिने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकून जगभरात भारताचा गौरव वाढवला. अंतिम फेरीत संधू जेव्हा स्टेजवर पोहोचली, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या लोकांसह मीडियाच्या नजरा तिच्या खास बिंज-सिल्व्हर गाऊनवर ( special binge-silver gown ) खिळल्या होत्या. या ड्रेसमध्ये हरनाज एखाद्या अप्सरेपेक्षा कमी दिसत नव्हती. मिळालेल्या माहितीनुसार, मिस युनिव्हर्सचा हा गाऊन प्रसिद्ध फॅशन डिझायनर साईशा शिंदेने   (Fashion Designer Saisha Shinde) डिझाइन केला आहे.

    फॅशन डिझायनर साईशा शिंदे हिला काही महिन्यांपूर्वी स्वप्नील शिंदे ( Swapnil Shinde ) या नावाने ओळखले जात होतं, परंतु जानेवारीमध्ये तिने स्वत:ला 'ट्रान्सवुमन' ( trans woman ) म्हणवून घेण्याचा निर्णय घेतला, आणि नाव बदलून 'साईशा' ठेवले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्वप्निल यांनी लिंग बदल करून घेतला आहे. त्यावेळी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती लोकांना दिली होती. ती म्हणाली, 'मला वर्षानुवर्षे आपण समलिंगी आहोत असं वाटत होतं, परंतु जेव्हा मला समजलं की ती एक 'ट्रान्सजेंडर' महिला ( transgender woman ) आहे, तेव्हा मी ही गोष्ट जाहीर करण्याचं ठरवलं.'

    तिने स्वतःच्या इन्स्टाग्रामवर याबाबत माहिती देताना लिहिले होते की, 'लहानपणापासूनच मी इतर मुलांपेक्षा वेगळी होते, त्यामुळे मला खूप त्रास झाला. मला सगळे चिडवायचे. पण त्यावेळी मला काहीच समजत नव्हतं. मला एकटेपणा वाटत होता.'

    साईशा शिंदेने स्वतःची ही स्टोरी जेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांसोबत शेअर केली, त्यामुळे अनेकांना मुक्तपणे जगण्याची प्रेरणा मिळाली आहे. साईशाने सांगितले होते की, 'तिच्या या ट्रांजिशन मुळे तिला खूप आनंद झाला.' मिस युनिव्हर्सच्या अंतिम फेरीपूर्वी न्यूज 18 शी बोलताना साईशा म्हणाली, 'प्रत्येक वेळी मिस युनिव्हर्स स्पर्धा असते तेव्हा मी खूप उत्साही असते, आणि यावेळी या स्पर्धेसाठी भारतातून जी मुलगी गेली आहे, तिच्यामध्ये स्पर्धा जिंकण्याची खूप क्षमता आहे, हे जाणून खूप आनंद होतो. मला हरनाजला टॉप 3 मध्ये बघायचे आहे. तसेच हरनाज जेव्हा या स्पर्धेचा किताब जिंकेल तेव्हा मला स्टेजवर हरनाजला मी तिच्यासाठी डिझाईन केलेला गाऊनमध्ये पाहायचे आहे.’साईशाने स्पर्धेपूर्वी व्यक्त केलेली ही इच्छा पूर्ण झाली आणि साईशाने डिझाइन केलेल्या गाउनचं कौतुकही झालं. त्यामुळे ती आता आनंदात आहे.

    First published:

    Tags: Entertainment