मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Mirzapur 3: गुड्डू भैय्या होणार आणखी भयानक; समोर आल्या 'मिर्झापुर 3'च्या जबरदस्त डिटेल्स

Mirzapur 3: गुड्डू भैय्या होणार आणखी भयानक; समोर आल्या 'मिर्झापुर 3'च्या जबरदस्त डिटेल्स

सध्या एखादा ट्रेंड आला की सर्वजण जणू त्यालाच फॉलो करु लागतात. मालिका असो, चित्रपट असो किंवा वेबसीरिज सध्या मनोरंजनसृष्टीत रिमेकची चलती दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत अनेक प्रोजेक्ट्सचे रिमेक पाहायला मिळाले आहेत. यामध्ये आता आणखी एका नावाची भर पडली आहे. ते नाव दुसरं कोणतं नसून 'मिर्झापूर' आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 15 जुलै- सध्या एखादा ट्रेंड आला की सर्वजण जणू त्यालाच फॉलो करु लागतात. मालिका असो, चित्रपट असो किंवा वेबसीरिज सध्या मनोरंजनसृष्टीत रिमेकची चलती दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत अनेक प्रोजेक्ट्सचे रिमेक पाहायला मिळाले आहेत. यामध्ये आता आणखी एका नावाची भर पडली आहे. ते नाव दुसरं कोणतं नसून 'मिर्झापूर' आहे. ही एक लोकप्रिय वेबसीरिज आहे हे वेगळं सांगायला नको. कारण 'मिर्झापूर'चा पहिला आणि दुसरा सीजन प्रचंड लोकप्रिय झाला होता. आता प्रेक्षक त्याच्या पुढील भागाची आतुरतेने वाट पाहात आहेत.प्रेक्षक जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत की या वेबसीरिजच्या तिसऱ्या भागात नेमकं काय असणार आहे? आज आपण याबाबतच माहिती घेणार आहोत. प्रेक्षकांची मागणी आणि पसंती लक्षात घेऊन निर्माते लवकरच मिर्झापूर सीजन 3 प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत.दरम्यान 'मिर्झापूर 3'बाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. ज्यावरून या वेबसीरिजच्या कथेचा अंदाज लावला जाऊ शकतो. आगामी सीजन 3 मध्ये, एकीकडे कालिन भैय्याचा मुलगा मुन्नाच्या हत्येमुळे खूप संतप्त दिसणार आहे. तर दुसरीकडे, गुड्डू भैया पूर्वीपेक्षा म्हणजेच गेल्या दोन्ही सीजनपेक्षा अधिक भयानक रुपात दिसणार आहे.त्यामुळे हा सीजन पुन्हा एकदा प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 'मिर्झापूर 3' मध्ये कालिन भैय्या आणि गुड्डू भैय्या यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळणार आहे. निर्मात्यांनी सीजन 3 ला पूर्वीपेक्षा अधिक भव्य आणि मनोरंजक बनवण्यासाठी प्रयत्न सुरु केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबईत सुरु असलेल्या सततच्या संततधार पावसातच 'मिर्झापूर 3' चं शूटिंग सुरु आहे. त्यामुळे हा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार यात काही शंकाच नाही. (हे वाचा:नयनतारा-विघ्नेशला मोठा फटका; Netflix ने रद्द केली तब्बल 25 कोटींची डील,काय आहे नेमकं प्रकरण? ) या वेबसीरिजमुळे अभिनेता अली फजलला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. सीजन 3 मध्ये अली फजल पूर्वीपेक्षा अधिक भयानक रुपात दिसणार आहे. त्या भूमिकेत स्वतःला परफेक्ट बसवण्यासाठी अलीने प्रचंड मेहनत घेतली आहे. त्याच्या या ट्रान्सफॉर्मेशने सर्वच थक्क होणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अली फजल सध्या मुंबईत सीजन 3 चं शूटिंग करत आहे. 'मिर्झापूर 3'मध्ये पुन्हा एकदा जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळणार आहे. कथेबद्दल बोलायचं झालं तर गुड्डू भैय्यालाही यावेळी तुरुंगात जावं लागणार आहे. पंकज त्रिपाठी लवकरच मुंबईत होत असलेल्या सीजन 3 च्या शूटिंगमध्ये सहभागी होणार आहेत.या सर्व डिटेल्सनंतर प्रेक्षकांच्या उत्सुकता आणखी वाढणार हे नक्की.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, OTT, Web series

    पुढील बातम्या